प्रत्येक हॉस्पिटल व नर्सिंग होम मध्ये खालील सुविधा असणे बंधनकारक.

Hospital Nursing Homes

Hospital Nursing Homes: नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला Hospital Nursing Homes बद्दल माहिती देत आहे. जे कि प्रत्येक हॉस्पिटल व नर्सिंग होम मध्ये जे सुविधा असणे बंधनकारक आहे. आणि महाराष्ट्र च्या नियमावली नुसार देखील असायलाच हवे. चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया.?

Hospital Nursing Homes : महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम 2021 अनुसूची एक नियम 11 पहा प्रमाणक्कांचे निकष.

प्रत्येक हॉस्पिटल व नर्सिंग होम मध्ये खालील सुविधा असणे बंधनकारक.

  •  1) चेक बेड साठी जागा किमान 65 चौरस फुट असणे बंधनकारक. एकूण वार्ड चे क्षेत्रफळ चौरस फूट बेडची संख्या 66 चौरस फूट.
  •  2) दोन बेडमधील किमान अंतर सहा फूट असायलाच हवे.
  •  3) दरवाजाची किमान रुंदी 3 फूट अणे असणे बंधनकारक
  •  4) प्रत्येक आठ बेडसाठी एक शोचालय असणे बंधनकारक.
  •  5) प्रत्येक बेडसाठी एक स्नान गृह असणे बंधनकारक.
  •  6) शौचालय व स्नानगृह चे क्षेत्रफळ किमान 36 चौरस फुट असणे बंधनकारक.
  •  7) समुद् पॅशन व स्वागत कक्षाचे किमान क्षेत्रफळ 140 चौरस फूट असणे आवश्यक.

तुमच्या भागातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये वरील प्रमाणे सुविधा आहेत का त्याची माहिती काढा जर नसतील तर अशा नियमभंग करणाऱ्या हॉस्पिटल व नर्सिंग होम यांची परिवाराची अधिकारी आरोग्य विभाग महानगरपालिका नगरपालिका किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी करा. तुमच्या एका तक्रारीमुळे सुविधा मिळून रुग्णांची चांगली सोय होईल.

Hospital Nursing Homes :  अनुसूची 3( नियम 11 क्यू आय पहा)

महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम 2021 नुसार. प्रत्येक नर्सिंग होम हॉस्पिटल मॅटर्निटी होम इत्यादी ठिकाणी खाली प्रत्येक सेवेसाठी किती रुपये शुल्क आकारले जाईल त्याचे दरपत्रक दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.

  •  1) रुपये प्रवेश शुल्क
  •  2) बेडचे दर (जनरल वाढ अतिदक्षता विभाग)
  •  3)  डॉक्टरांचे चार्जेस
  •  4)  सहाय्यक डॉक्टरांचे चार्जेस
  •  5) भूलतज्ञ शुल्क प्रति व्हिजिट
  •  6)  शस्त्रक्रिया गृह शुल्क
  •  7) शस्त्रक्रिया गृह सहाय्यक शुल्क प्रति भेट.
  •  8)  शुश्रूषा नर्सिंग शुल्क प्रतिदिन
  •  9) सलाईन व रक्तसंक्रमण शुल्क
  •  10) डॉक्टरांची विशेष भेट शुल्क.
  •  11) भूल सहाय्यक शुल्क प्रति भेट.
  •  12) मल्टी प्यारा मॉनिटर शुल्क.
  •  13) पॅथॉलॉजीतील विविध तपासणीचे दर
  •  14)  ऑक्सिजन शुल्क
  •  15) रेडिओलॉजी सोनोग्राफी शुल्क.

असे दर पत्रक जर तुमच्या भागातील हॉस्पिटल नर्सिंग होम मॅटर्निटी होम मध्ये लावले नसेल तर वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद जिल्हा चिकित्सक शासकीय आरोग्य अधिकारी यापैकी योग्य त्या ऍथॉरिटी कडे लेखी तक्रार करा.

खाजगी वैद्यकीय सेवा बद्दल आलेल्या अनुभवांची जनमत प्रश्नावली.  हो किंवा नाही या दिलेल्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय यावर टिक करून आपले मत नोंदवावे.

हेही वाचा : 

Important Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !