Sarpanch-police-patil-acb-chya-jalyat |
ना हरकत प्रमाणपत्र साठी पैशाची मागणी.सरपंच,पोलिस पाटील लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.
भंडारा जिल्हा खानीकर्म अधिकाऱ्यांननी अधिकाऱ्यांनी मुदतवाढ दिल्यानंतरही ग्रामपंचायतीचा ना हरकत प्रमाणपत्रासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना भंडारा तालुक्यातील नवरगाव येथील सरपंच व पोलिस पाटलाला सपूत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नवर गाव येथे करण्यात आले.
सरपंच रवींद्र कवडू आजबले 42 पोलीस पाटील रामकृष्ण धर्माजी आजबले 53 अशी लाच घेणार्यांची नावे आहेत भंडारा तालुक्यातील नवरगाव येथे गौण खनिज खान आहे. तक्रारदाराने जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडून एक वर्षासाठी मुदतवाढ घेतली ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय खोदकाम करता येणार नाही अशी धमकी धमकी सरपंच रवींद्र आजबले व पोलीस पाटील राम कृष्ण आज भले यांनी दिली तसेच साठ हजार रुपये लाचेची मागणी केली यावरून तक्रारदाराने भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली खात्री करून शुक्रवारी सायंकाळी नवरगाव येथे सापडा रचला.
सरपंच रवींद्र आजबले यांनी 50 हजार रुपये स्वीकारले त्यावरून त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई भंडारा लाचलुचपत विभागाने पोलीस उपअधीक्षक महेश साठे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के अमित देव्हारे पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर पोलीस शिपाई अतुल मेश्राम मिथुन चांदेवार विष्णूवर की अंकुश गाढवे कुणाल कडव राजकुमार लेंडे रणदिवे यांनी केली.
भंडारा तालुक्यातील एका व्यक्तीने नवरगाव येथील गुण खनिज खोदण्यासाठी खनिकर्म विभागाकडून परवानगी घेतली होती मात्र सरपंच व पोलीस पाटलांनी ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय काम करता येणार नाही अशी धमकी देऊ लाचेची मागणी केली होती.
Next page. |
Next page
Leave a Reply