Grampanchayt :ग्रामसेवक यांनी केला सहा लाखांचा भ्रष्टाचार.

Rural News Gramin batmya Gramin News
Grampanchayat Bhrashtachar News


ग्रामसेवक जीवन कोल्हे यांनी केला सहा लाखांचा भ्रष्टाचार.

बँकेत पैसे जमा न करता स्वतः खर्चाकरिता वापरले.

ग्रामीण बातम्या : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत शिरूळ येथील ग्रामसेवक जीवन कोल्हे यांनी सामान्य खंडातील रक्कम रीतसर बँकेत जमा न करता तब्बल सहा लाख 31 हजार 183 रुपयांचा फार केला.

ही रक्कम त्यांनी स्वतःच्या खर्चाकरिता वापरली तसेच चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे परिणामी आता जीवन कोल्हे यांच्या वर गुन्हा दाखल करत त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

 ग्रामसेवक जीवन कोल्हे ग्रामपंचायत येथे कामावर राहत नसून जनतेची कामे करीत नाही. तसेच ते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याची तक्रार या पूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी हिंगणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बाळा यावले यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर चार सदस्यीय अधिकाऱ्यांनी एक समिती नेमण्यात आली.

समितीमध्ये हिंगणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वाडा यावले कृषी अधिकारी मेश्राम पंचायत विस्तार अधिकारी राजकुमार बामणे आणि शेषराव चव्हाण तसेच कनिष्ठ लेखाधिकारी यांचा समावेश होता समितीचे जीवन कोल्हे यांची चौकशी केली असता त्यात अनेक प्रकारचे भ्रष्टाचार उघडकीस आले कोल्हे हे ग्रामपंचायतीमध्ये येणारा पंढरीचा बँकेत जमा न करता स्वतःच्या खर्चाकरिता वापरत होते. त्यांच्याकडे काम निमित्त येणाऱ्या नागरिकांसोबत त्यांची वागणूक देत होती समितीचे सर्व भ्रष्टाचार व्यवहाराच्या विषय केला असता कोल्हे यांनी एकूण 431103 अशी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे चौकशीत उघड आले आहे.

मागासवर्गीयांना निधीदेखील ठेवता अखर्चित.

 ग्रामपंचायत शिरूर येथील सन 2021 सन 2022 या आर्थिक वर्षात 33 लाख 41 हजार 487 इतके उत्पन्न झाले असून 15 टक्के मागासवर्गीय खर्च 501220 रुपये खर्च करणे अपेक्षित होते ग्रामपंचायतीने त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी 15 टक्के रक्कम प्रति वर्षी मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी देण्यासाठी खर्च केला पाहिजे परंतु कोल्हे यांनी फक्त 4770 रुपये खर्च केलेले आहेत एकूण खर्चाची टक्केवारी हि समाधान कारक आहे.

 आणि या व्यतिरिक्त महिला व बालक खर्च तीन लाख 34 हजार 140 रुपये खर्च करणे अपेक्षित होते परंतु सदर त्यांनी आठ लाख 53 हजार सात रुपये खर्च केलेले आहेत एकूण खर्चाची टक्केवारी 25% समाधानकारक आहे दिव्या अंगावर एक लाख 67 हजार 73 रुपये खर्च करणे अपेक्षित होते. साठ हजार रुपये खर्च केले. त्यांच्या प्रकृतीच्या कारणावरून ही मोठा संभ्रम आहे सुट्टीचा कालावधी असतानादेखील वसुलीची रक्कम परस्पर खर्च दाखवून रोकड वही मध्ये नोंद देऊन फार केल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

 आतिश उमरे. 

 विरोधी पक्ष नेते जिल्हा परिषद नागपूर.

 ग्रामसेवक जीवन कोल्हे यांचा उद्धट वाघिणीचा तसेच कामावर हजर न राहणे शासकीय रकमेचा अपहार करणे अशा तक्रारी माझ्यापर्यंत आल्या होत्या कोल्हे यांनी टॅक्सच्या पैसा बँकेत जमा केला नाही व परस्पर खर्च केला त्यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मी हा मुद्दा उचलून धरला आणि त्यानंतर चौकशी समितीत ग्रामसेवक जीवन कोल्हे यांनी अनेक घोटाळे समोर आले आहेत.

ग्रामसेवक जीवन कोल्हे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी मी स्वतः जिल्हा परिषद योगेश कुंभेजकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !