RTI कार्यकर्त्यानं लावलं कामाला / RTI activists

RTI activists

RTI activists : आरटीआय कार्यकर्त्यानं लावलं कामाला ; महापालिकेचे रिक्षा भरून कागद झेरॉक्सला सहायक अभियंता प्रकरण : बांधकाम कर्मचारी दोन दिवसांपासून एकाच कामात.

राकेश कदम RTI activists :

राकेश कदम सोलापूर माहिती अधिकार कार्यकर्त्याला वेळेवर माहिती न देणे महापालिकेला महागात पडले आहे. राज्य माहिती आयोगाच्या आदेशानंतर नगररचना विभागाला रिक्षा भरून कागदपत्रे देण्याची वेळ आली. पालिकेचे अधिकारी शुक्रवारी एका रिक्षात कागदपत्रे भरून झेरॉक्स दुकानात गेल्याचे दिसून आले.

माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास बनसोडे यांनी ४ ऑगस्ट २०२३ रोजी महापालिकेला पहिला अर्ज दिला. या अर्जात त्यांनी नगर अभियंता विभागातील आवेक्षक शाम कन्ना यांचे नियुक्तीपत्र, आजवर कोणत्या विभागात काम केले, कन्ना यांनी आजवर केलेल्या कामाची माहिती मागवली होती, नगर अभियंता विभागाच्या जन माहिती अधिकारी सारिका आकूलवार यांनी ही माहिती न दिल्यामुळे बनसोडे यांनी अपिलीय अधिकारी तथा सहायक संचालक, नगररचना संभाजी कांबळे यांच्याकडे ५ सप्टेंबर २०२३ रोजी अपील केले.

कांबळे यांच्याकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने बनसोडे यांनी राज्य माहिती आयोगाकडे १ जानेवारी २०२४ रोजी अपील केले. या अपिलावर ११ मार्च २०२४ रोजी सुनावणी झाली. आयोगाने सात दिवसांच्या आत माहिती द्या, असे आदेश महापालिकेला दिले. या आदेशानंतर माहिती मिळेना म्हणून बनसोडे यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे अर्ज केला आणि आयोगाच्या आदेशाची माहिती दिली.

बांधकाम विभागप्रमुख थेट दुकानात

शहरातील ७०० बांधकाम प्रकरणांच्या फायली आवेक्षक शाम कन्ना यांनी हाताळल्या आहेत. या फाडलीतील कागदपत्रांवर त्यांच्या सह्या आहेत. या सर्व फायली, बांधकाम नकाशे, जागेचे नकाशे असलेल्या फाइलींचे गड्ढे सिद्धेश्वर मंदिर परिसरातील एका दुकानात शुक्रवारी पाठविण्यात आले. बांधकाम विभागाचे प्रमुख नीलकंठ मठपती शुक्रवारी सायंकाळी ठाण मांडून होते. जवळपास १० हजार कागदांच्या झेरॉक्स काढल्या होत्या. झेरॉक्सचा खर्चही पालिकाच करणार आहे.

( RTI activists ) कन्ना यांनी आरोप फेटाळले

श्याम कन्ना यांनी श्रीनिवास बनसोडे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कन्ना यांची नियुक्ती सध्या विभागीय कार्यालयामध्ये आहे. मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी मागील वर्षी बांधकाम परवाना विभागातील चार अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर या विभागातील इतर अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी सुरू झाल्या होत्या.

Related News Post : GR Of Maharashtra 

RTI activists तक्रार काय?

बांधकाम परवाना विभागात बेकायदेशीर बांधकाम परवाने देण्यात आले, यात कन्ना यांचा सहभाग असावा, अधिकार नसताना त्यांनी परवाने दिले. ही सर्व प्रकरणे जाणून घेण्यासाठी अर्ज केल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

दप्तरी खोलीला लावले कुलूप

बांधकाम परवाना विभागातील कर्मचारी गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसभर कन्ना यांच्या सहीच्या फाइली शोधत होते. शुक्रवारी दुपारी ७०० हून अधिक फाइली दप्तरी खोलीतून काढल्या. त्यानंतर या खोलीला कुलूप लावण्यात आले.

श्रीनिवास बनसोडे यांनी मागितलेली सर्व कागदपत्रे त्यांना लवकरच देण्यात येतील, झेरॉक्सचा खर्च पालिकाच करेल, बनसोडे यांना यापूर्वीच माहिती का दिली नाही याचे उत्तर वरिष्ठच सांगू शकतील. मी केवळ त्यांच्या आदेशानुसार काम करीत आहे. – नीलकंठ मठपती. बांधकाम परवाना विभाग प्रमुख, मनपा.

हेही वाचा: ग्रामपंचायत ला माहिती अधिकार अर्ज कसा करावा .

Conclusion :

अशाच प्रकारचे माहिती अधिकार चे विविध सबंधित माहिती  जाणून घेण्यसाठी आमच्या सोसिअल मेडिया ला फॉलो करा किंवा जॉईन व्हा जेणेकरून नवनवीन माहिती आम्ही तुमच्या पर्यंत लवकरच शेअर करू  धन्यवाद

RTI activists Important Link

You Tube Channel Link

WhatsApp Channel Link

Instagram Channel Link

Facebook Channel Link

शासकीय योजना : Mahadbt Scheme

Mahadbt Scholarship 2024

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !