रस्त्याच्या वायु प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा.

वायु प्रदूषण

पिंपळनेर – सटाणा रस्त्याच्या वायु प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा. अखिल भारतीय मानवाधिकार संघाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार. (  वायु प्रदूषण )

वायु प्रदूषण

वायु प्रदूषण

पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या विंचुर – प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 – G चे चौपदरी करणाचे काम गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित आहे. एकविरा माता कॉर्नर ते सामोडे चौफुली पर्यंतच्या रस्त्यावर खूप खड्डे पडले असून पिंपळनेरच्या नागरिकांना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वायु प्रदूषण जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा.

या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत तर दुर्दैवाने एका व्यक्तीला जीव देखील गमवावा लागला आहे. त्याबाबत दि.8 -9- 23 रोजी मा.मुख्य कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम एम आर डी सी) मुंबई, मा. कार्यकारी अभियंता सो.नाशिक,मा. प्रकल्प संचालक सो.धुळे, मा. जिल्हाधिकारी सो. धुळे, मा. उपविभागीय अधिकारी सो. धुळे विभाग धुळे,मा. अपर तहसीलदार सो. पिंपळनेर यांच्याकडे लेखी तक्रार करुणही अद्याप त्याची दखल घेतली गेलेली नाही.

या रस्त्यावर सदर कॉन्ट्रॅक्टरने खड्डे बुजवण्यासाठी माती मिश्रीत मुरूम टाकल्यामुळे प्रचंड धुळ उडत असते, त्यामुळे पिंपळनेरच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास घेण्यास अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे श्वसन विकार, खोकला,फुफुस संसर्ग आदी अधिक गंभीर त्रासांना जनतेला सामोरे जावे लागत आहे.

सदर रस्त्यावरील प्रदूषण रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना अद्याप केलेली नाही. या रस्त्यावर धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी नियमित पाण्याची फवारणी व धूळ शोषक यंत्र कार्यान्वीत करणे आवश्यक आहे.धुळीमुळे हवेच्या प्रदूषणात खूपच वाढ झाली असून जनतेला आजारांना सामना करावा लागत आहे.

त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून विविध आजारांचा धोका वाढला आहे. परिणामी पर्यावरण कायद्याचे देखील उल्लंघन झालेले आहेत. सदर रस्त्यासाठी अनेक वेळा तक्रारअर्ज, निवेदने , रास्ता रोको सारखे प्रकार करूनही त्याबाबत कुठलीही दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही.

पिंपळनेर शहरातील वाढत्या प्रदूषणास व त्यापासून होणाऱ्या आजारास जबाबदार व कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांवर प्रदूषण प्रतिबंधक कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

अशी मागणी अखिल भारतीय मानवाधिकार संघा चे अध्यक्ष श्री. प्रविण शंकरराव थोरात यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई व पुणे यांच्याकडे केली आहे.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Third degree in police investigation ? pdf येथे क्लिक करा 
Third degree in police investigation ? Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !