जागतिक माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा.

जागतिक माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक माहिती अधिकार दिन उत्साह साजरा.

पिंपळनेर  – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. सुभाषजी बसवेकर साहेब व अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे राज्य समन्वयक आदरणीय श्री. कांतीलालजी जैन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर व अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक माहिती अधिकार दिन कर्म. आ.मा. पाटील विद्यालयाच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून पिंपळनेर पोलीस स्टेशनचे ए. पी.आय. आदरणीय श्री. श्रीकृष्ण पारधी साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर अपर तहसीलचे नायब तहसीलदार आदरणीय श्री. बहिरम साहेब , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री.पी. एस. दादा साहेब. 

साक्री येथील सामाजिक कार्यकर्ते व ऑडिटर आदरणीय.श्री. शुभम गौंड साहेब , सौ. जे. डी. शिंदे इंग्लिश मिडियम स्कूल पिंपळनेरचे चेअरमन आदरणीय श्री.हंसराजजी  दादा शिंदे , पिंपळनेर पोलीस स्टेशनचे आदरणीय श्री. लक्ष्मण गवळी साहेब व आदरणीय श्री. पावरा साहेब हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा शाल , श्रीफळ गुलाबपुष्प व माहिती अधिकार कायद्याची पॉकेट डायरी भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेरचे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. प्रविण थोरात यांनी केले , तर माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. पी. एस, दादा साहेब माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेरचे अध्यक्ष श्री. कैलास भदाणे व उपाध्यक्ष श्री. रोहिदास सावळे यांनी विशद केले.

 अध्यक्षीय भाषणात पिंपळनेर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. आदरणीय श्री.श्रीकृष्ण पारधी साहेब म्हणाले – माहिती अधिकार हे एक मोठे प्रभावी शस्त्र आहे, त्याचा योग्य वेळी वापर केला पाहिजे, त्याचा समाजाला फायदा व्हायला हवा. असे प्रतिपादन त्यांनी केले. 

तसेच ऊपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन देखील केले. कार्यक्रमा शेवटी आभार प्रदर्शन मा. श्री. अनिल महाले सर यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन कु. प्रतिक्षा दिलीप दुसाने व कु.योगेश्वरी चंदन सूर्यवंशी यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. प्रविण थोरात , श्री. कैलास भदाणे,श्री. रोहिदास सावळे,श्री. हंसराजजी शिंदे,श्री. रावसाहेब शिंदे,श्री.चंद्रकांत अहिरराव श्री. पराग महाजन,श्री. अनिल महाले, श्री. प्रमोद जोशी, श्री. राजेंद्र एखंडे, श्री.लक्ष्मीकांत अहिरराव, श्री. निशांत पाटील,श्री. मुकुंद खैरनार, श्री.सोमनाथ बागुल, श्री. महेश नंदन सर, श्री.मानकर सर श्री. बर्डे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !