चंद्रकांत रघुवंशीला (चंदु भैय्या) फोटो व पुतळ्याला जोडे मारो आंदोलन, शहाद्यात आदिवासी संघटना आक्रमक…
नंदुरबार विशेष प्रतिनिधी ।
Tribal organization aggressive in Shahada : दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी शहादा येथे चंदूभैया चंद्रकांत रघुवंशी – शिवसेना शिंदे गट नंदूरबार यांनी मा. पद्माकर वळवी, आदिवासी नेते तथा माजी मंत्री नंदूरबार जिल्ह्याचे आदिवासी रहिवाशी यांना नंदूरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी दिली म्हणून त्याविरोधात चंद्रकांत रघुवंशीच्या फोटो पुतळ्याला जोडे मारून आदिवासी समाजाने जाहीर निषेध नोंदवला.
चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा, या मागणीचे निवेदन मा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे शहादा जि. नंदुरबार* यांना देण्यात आले.
या चंदूभैयाचे करायचे काय, खाली डोक वर पाय, चंदूभैया मूर्दाबाद, मूर्दाबाद, मूर्दाबाद, चंदूभैया चले जाव, नंदुरबार छोडो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. बिरसा फायटर्स, भारतीय आदिवासी संविधान सेना, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन सह विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Read More
Leave a Reply