ग्राहक तक्रार निवारण मंचाचा महावितरणला दंड : Consumer Grievance Redressal Forum fines Mahavitaran

तालुका प्रतिनिधी :- दि. महावितरण कार्यालयकडे घरगुती विज पुरवठासाठी अर्ज सादर केल्यानंतर ग्राहकास मुदतीत विज पुरवठा न दिल्यामुळे ग्राहक तक्रार निवारण मंच नाशिक यांनी महावितरणला दंड ठोठावला आहे. याबाबत वस्तुस्थिती अशी की प्रकाश चांगदेव मुरादे रा. खडकदेवळा ता. राहता. जि. अहमदनगर येथील रहिवाशी असुन त्यांनी महावितरण कार्यालय यांच्याकडे दि. 26-9-2023 रोजी अर्ज विज कनेक्शन साठी सादर केला. त्यानंतर महावितरणकडुन अर्जदार यांना 6118 रुपयाचे कोटेशन देण्यात आले . Consumer Grievance Redressal Forum fines Mahavitaran

ग्राहकाने कोटेशन रक्कमेचा भरणा दि. 30-9-2023 केला. माञ महावितरणकडुन ग्राहकाला विज पुरवठा न देताच तोंडी सतरा हजार रुपये खर्च करावे लागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर ग्राहकाने दिलेल्या दिलेल्या अर्जावर महावितरण कडुन स्थळ परिक्षण करुन पोलपासुन अंतर 200 मिटर आहे.तरी आपण शासकिय कंञाटदार यांच्याकडुन एकपोल च्या कामाची मजुंरी घेवुन काम करुन घ्यावे. व त्यानंतरच आपले कनेक्शन देण्यात येईल. असे सहाय्यक अभिंयता यांनी 28-9-23 ग्राहकाच्या अर्जावर लेखी लिहुन दिले.

त्यानंतर ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण मंच नाशिक यांच्याकडे दि. 30-10-23 रोजी तक्रार दाखल केली .विज अधिनियम 2003 चे कलम 42 नुसार विजेचा पुरवठा करणे हे महावितरणचे कर्तव्य आहे.तसेच विज अधिनियम 2003 चे कलम 43 नुसार अर्जदाराने विज पुरवठ्याची मागणी करणारा अर्ज सादर केल्यानंतर एक महिन्याच्या आत व नविन जोडणी करिता वितरण वाहिनीची क्षमता वाढ किंवा नविन वाहिनी उभारणे महावितरणला गरजेचे असल्यास नव्वद दिवसात काम पुर्ण करून विज पुरवठा देणे बंधनकारक आहे.

पायाभुत सुविधाची उभारणी करणे हे महावितरणचे कर्तव्य असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपिल क्र. 7572/2011 मध्ये सुध्दा नमुद केलेले आहे.ग्राहकाने स्वताहुन मागणी केल्याशिवाय महावितरण ग्राहकास बाध्य करु शकत नाही.विदयुत कायदा 2003 चे कलम 43 (1) नुसार महावितरणने नविन विज पुरवठा करण्याकरिता दिलेल्या कालमर्यादेचे पालन करणे गरजेचे असते. महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग विनियम 2021 विनियम 5.8 नुसार अर्जदाराने कोटेशन रक्कमेचा भरणा केलेल्या दिंनाकापासुन 30 दिवसात व नविन विज वाहिनी उभारणे गरजेचे असल्यास नव्वद दिवसात विज पुरवठा देणे बंधनकारक आहे ( Consumer Grievance Redressal Forum fines Mahavitaran )

ग्राहक तक्रार निवारण मंचाचा महावितरणला दंड : Consumer Grievance Redressal Forum fines Mahavitaran
ग्राहक तक्रार निवारण मंचाचा महावितरणला दंड : Consumer Grievance Redressal Forum fines Mahavitaran

ग्राहकाने दाखल केलेल्या तक्रार अर्जावर ग्राहक तक्रार निवारण मंच यांनी 5-9-2024 रोजी सुनावणी घेवुन मंचाने दि.3-10-24 रोजी आदेश पारित केला महावितरणने ग्राहकास सुमारे तिस दिवस विलंबाने विज पुरवठा दिला आहे . त्यामुळे विज कायदा 2003 चे कलम 43(1) नुसार 31 व्या दिवसापासुन प्रति दिवस 500 या प्रमाणे नुकसान भरपाई दयावीतसेच सहाय्यक अभिंयता यांनी विज पुरवठा मिळण्यासाठी पोल टाकावे लागतील असा शेरा दिला त्या अभिंयता वर नियमाप्रमाणे कारवाही करावी.

आदेशाची अमलबंजावणी करुन अहवाल मंचास तिस दिवसात सादर करावा. सदर प्रकरणी मंचासमोर महावितरणकडुन डी.डी.पाटील उपकार्यकारी अभियंता राहता यांनी बाजु मांडली तर ग्राहकाच्या वतीने विज ग्राहक संघटना शेगांव तालुका अध्यक्ष अंबादास पवार शेगांव यांनी बाजु मांडली.

( Consumer Grievance Redressal Forum Fines Mahavitaran )

हेही वाचा :

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !