Moka Vadal | ‘मोका’ वादळामुळे पावसाची शक्यता.

मोका’ वादळामुळे पावसाची शक्यता.

मुंबई : राज्याच्या अनेक भागात रविवारी पावसाने हजेरी लावली असताना बंगालच्या उपसागरात विकसित होऊ घातलेल्या ‘मोका’ चक्रीवादळामुळे राज्यातही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वादळामुळे पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना ११ मेपर्यंत सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.


मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांत रविवारी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून अनेक

भागांत विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडत आहे, तर राज्यातील काही ठिकाणी गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईतही वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे उकाडा कमी जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील कमाल तापमानात काहिशी घट झाली आहे. मात्र, आद्रतेमुळे उकाडा कायम आहे.

मुंबईत कमाल तापमान ३५ ते ३६ अंशापर्यंत जाऊ शकते मात्र कमाल तापमानाचा पारा फारसा नसेल, असे हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली वादळी आणि तसेच मे नंतर वाऱ्यांची दिशा बदलण्यास सुरूवात होईल, यामुळे तापमान वाढणार नसल्याची शक्यता आहे.

O

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !