विद्यार्थ्यांचे आधार ३० एप्रिलपर्यंत अपडेट करा, नाही तर अनुदान विसरा !
ग्रामीण बातम्या : नव्याने अनुदानावर येणान्या शाळा, महाविद्यालयांना वेतन अनुदानासाठी संचमान्यता आवश्यक आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. यानुसारच अनुदान मिळणार आहे. ही अंतिम संधी आहे. त्यानंतर अनुदानाला मुकावे लागू शकते.
आधी शाळा सुरू झाल्यावर लागलीच अनुदान दिले जात नव्हते. विनाअनुदान तत्त्वावर मान्यता दिली जायची. सर्व अटींचे पालन केल्यावर सुरुवातीला २० टक्के अनुदान दिले जायचे. त्यामध्ये नंतर वाढ केली जायची. जळगाव जिल्ह्यात १६० पेक्षा अधिक शाळांना अनुदानावर येण्याची प्रतीक्षा होती.
Related Post .
राज्याच्या इतर भागांतही अशा शाळा होत्या. शिक्षक संघटनांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाने २० टक्के, ४० टक्के व ६० टक्के प्रमाणे अनुदान घोषित केले; पण त्यासाठी आधार आधारित संच मान्यता मंजूर करून घेण्याची अट टाकली. ही प्रक्रिया पूर्ण केलेल्या शाळांनाच अनुदान लागू केले जात आहे. मार्चअखेर १६९ शाळांना अनुदान मिळाले, तर १४ ते १६ शाळांची पडताळणी बाकी होती. आधार आधारित संचमान्यता केली नाही, तर निकषात बसत असूनही त्यांना अनुदानाला मुकावे लागणार आहे.
१९ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट बाकी.
जिल्ह्यातील १५ तालुक्यात १९ टक्के विद्यार्थ्याचे आधार अपडेट करणे अद्याप बाकी आहे. यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. थेट शाळेतून आधार अपडेट होत नाही. त्यांच्याकडून ते आधार पोर्टलला (यूआयडीएआय) जाते. तेथून अपडेट होते. आधार उपलब्ध नसलेले विद्यार्थीही आहेत..
३० एप्रिलची आहे डेडलाईन
■ अनुदानावर येण्यासाठी पात्र असलेल्या शाळांना आधार आधारित संच मान्यता करावी लागणार आहे. त्यासाठी शासना कडून सातत्याने सूचना केली जात आहे.
■ तरीही काही शाळांची संच मान्यता झालेली नाही. त्यांना आता ३० एप्रिलची शेवटची संधी देण्यात आली आहे, त्यानंतर कदाचित मुदत वाढवून मिळणार नाही.
२०२२-२३ च्या संच मान्यतेत मंजूर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणी पूर्ण.
नव्याने अनुदानावर येणाऱ्या शाळांतील विद्याथ्यांचे आधार अपडेट करण्याचे काम केले जात असतानाच त्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. आधार तातडीने अपडेट करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.
किती शाळा- महाविद्यालयांना किती टक्के अनुदान?
- २० टक्के अनुदान.
जिल्ह्यातील ७७ शाळांना २० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. याचा लाभ ४०७ शिक्षकांना झाला आहे.
- ४० टक्के अनुदान
जिल्ह्यातील २४ शाळांना ४० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. याचा लाभ १२५ शिक्षकांना झाला आहे.
- ६० टक्के अनुदान
जिल्ह्यातील ६८ शाळांना ६० टक्के अनुदान मंजूर झाले आहे, याचा लाभ ६५७ शिक्षकांना झाला आहे,
शासनाचे आदेश, शाळांना आवाहन.
शासनाने आधार आधारित संच मान्यता करून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे अनुदानपात्र शाळांनी ३० एप्रिलपर्यंत विद्याथ्यांच आधार अपडेट करून घ्यावेत, असे आवाहन शिक्षण विभागाच्या अधिकायांनी केले आहेत.
Leave a Reply