आदिवासी क्रांतिवीर सोमा डोमा आंध | Soma Doma Andha Biography and History In Marathi

आदिवासीचे प्रेरणास्थान क्रांतिवीर सोमा डोमा आंध यांची आज जयंती निमित्त सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोमा डोमा.

क्रांतीवीर सोमा डोमा आंध (उमरे) यांचे जीवनचरित्र सोमा डोमा आंध : जन्म – 9 मार्च 1897, शहिद -10/12/1943 सोमा डोमा आंध यांचा इंग्रजाविरूध्द उठाव : ( 1930- 1943 )सोमा डोमा आंध हे विदर्भातील यवतमाळ जिल्हातील अग्रगण्य स्वातंत्र्यवीर होते. यवतमाळ नगरपरीषदेच्या कार्यालयात जिल्हातील स्वातंत्र्यवीराची जी सुची आहे.

Soma Doma Andha Biography and History In Marathi


Soma Doma Andha Biography and History In Marathi  त्यामधे त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. सोमा डोमा हे आंध आदिवासी जमातीचे होते.त्यांचे आडनाव उमरे असे होते. यवतमाळ ते पुसद या मार्गात पाच किलोमीटर अंतरावर घाटाचा रस्ता आहे.


या रस्त्यावर चंदन आणि साग या वृक्षांचे घनदाट जंगल आहे. त्याच जंगलात उमरडा / उमर्डा असे एक आंधआदिवासींचे लहानसे खेडे होते. स्वातंत्र्यवीर सोमा डोमा उमरे हे त्याच उमडर्याचे होते.


सोमा जात्यातच तल्लख बुध्दीचे होते. ते लहानपणापासूनच करारीवृत्तीचे असल्यानेकोणीही केलेल्या अन्याय – अत्याचार त्यांना सहन होत नसे. त्यांनी सावकार ,जमीन दार ,पाटिल यांनी आदिवासी लुबाडून शेकडो एकर जमिनी बळकावल्या या विरूद्ध लढा पुकारला आणि ,यांच्याकडून आदिवासीवर होणारा अन्यायाविरूध्द मोठया प्रमाणात जनजागृती सुरू केली.


हे लोक आपल्यावर कशाप्रकारे अन्याय-अत्याचारकरतात. ते आपल्या लोकांना पटवून देत असत. म्हातारे लोक सांगतात, सोमा स्वातंत्र्य चळवळीच्यावेळी सभेत बोलत असतांना समोरच्या लोकात वीरश्रो संचारत असे. ते अजिबात कोणालाही घाबरत नसत .

इंग्रजांच्या विरोधात जनआदोलन

अतिशय निडर वृत्तीचे होते.पूर्ण विदर्भात इंग्रजांच्या विरोधात जनआदोलन उभे करण्यासाठी अनेक जनजागृतीच्या सभा घेतल्या.पूढे 1930 ते 1947 पर्यंत इंग्रजी सत्तेच्या विरोधात देशात सक्रीय आंदोलने झाली. त्या आंदोलनयांचे लोण यवतमाळसारख्या आदिवासी बहूल जिल्ह्यापर्यंत सुध्दा पोहचले. यवतमाळ जिल्हात धुंदी येथे जंगल सत्याग्रह झाला. त्यांचे नेतृत्व सोमा डोमा आंध यांनी केले.

सोमा डोमा आंध हे सहभागी स्वातंत्र्य चळवळीत होते.

या आंदोलनात गोविंदराव बुचके व इतर अनेकआंध तरूण सहभागी झाले होते. यात त्यांना अटकपण झाली . वणी व चंद्रपूरकडे स्वातंत्र्य चळवळी झाल्या. त्यातही सोमा डोमा आंध हे सहभागी झाले होते. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी मातृभूमीचे स्वातंत्र्य हे एकच ध्येय डोळयासमोर ठेवून व त्या ध्येयाने प्रेरीत होवून परिसरातील कूठेही आंदोलन चालू असले की सोमा डोमा आंध त्या आंदोलनात सहभागी होत असत.

Soma Doma Andha Biography and History In Marathi Redding.

त्यानी आपल्या परंपरागत शस्त्राचा भाल्यासारखा वापर करून अनेक गणिमाना टिपले तसेच ते महात्मा गांधी वर्धा येथे राहात असतांना सोमा डोमा आंध व इतर स्वातंत्र्यसेनानी त्यांना जाऊन भेटले होते.अशा या महान स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजरा..

जय आदिवासी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !