महाराष्ट्रातील प्रसिद्ध अश्या मोहटादेवी मंदीराच्या ट्रस्ट आणि कर्मचाऱ्यांचा अजब कारभार भाविकांना रोज निकृष्ट दर्जाचे जेवण ? गडावर वाहन न्यायचे असल्यास 100/- ची पावती
या बाबत सविस्तर वृत्त असे की पाथर्डी तालुक्यातील महाराष्ट्रात सु प्रसिद्ध जगदंबा माता : Amazing management of temple trust and staff
मोहटादेवी मंदीराच्या गाभाऱ्यात परिसरात अन्नछत्र व भक्त निवासात नियुक्त्त कर्मचारी वर्ग बाहेरगावाहून आलेल्या भाविक भक्तांची अडवणूक करतात. वर्षभर वर्दळ असलेले देवस्थान त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून महाराष्ट्र शाशन आणि ट्रष्टी विविध योजना भाविकांसाठी राबवत असतात त्यात भक्तनिवास अन्नछत्र दवाखाना आदी उपक्रम राबवले जातात यासाठी अनेक कर्मचारी नियुक्त्त आहेत.
नियमाप्रमाणे नियुक्तीस असलेल्या कर्मचाऱ्याचा खाकी ड्रेस आणि ड्रेसवर नेमपेल्ट असणे बंधनकारकअसावे जेणेकरून येणार्या भाविक भक्तांना त्यांच्याकडून काही त्रास झाल्यास त्यांची तक्रार करण्यास मदत होईल प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे आहे असे दिसते पार्किंग चे नियुक्त्त कर्मचारी बळजबरीने पैसे घेऊन १०० रुपये पावती देऊंन विना क्रमांकाच्या पावत्या दिल्या जातात देवस्थान ला दानपेटीत लाखो रुपयांची देंणगी येते. रोज महाप्रसादा मध्ये भाविकांना बाजरी भाकर ,साधा भात, पातळ आमटी भाजी म्हणुन दिली जाते. याचे बिल मात्र सरकारी तिजोरीतुन अव्वाच्या सव्वा काढले जाते मंदिराला मिळणाऱ्या
लाखो रुपये देणगीचे पुढे काय होते. असा प्रश्न मोहटादेवी च्या त्रासलेल्या भाविकांना पडला आहे. रोजच्या महाप्रसादात कमीत कमी एखादा गोड पदार्थ असावा भाकरी व सोबत चपाती पण द्यावी असा प्रश्न भक्तानी उपस्थित केला. अनेक अबाल वृद्ध महिला, आजारी लोक लांब लांबुन येतात. अनेकांना याठिकाणी देवस्थानच्या पार्कीग मध्ये बसवलेल्या गट्टु उन्हामूळे तापतात त्यामुळे पायाची आग होते यासाठी ईतर देवस्थान मध्ये बसवलेल्या फरशीवर पायघड्या अंथरल्या जातात त्याचा उपयोग वयस्कर भाविक भक्त महीला, लहान बालके यांना होईल विशेष म्हणजे शासनाकडून मुख्याधिकारी म्हणुन विशेष नियुक्ती केली जाते त्यानी बारकाईने या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व सावळ्या गोंधळाची तक्रार त्रासलेले भाविक भक्त धर्मदाय उप-आयुक्त अहिल्यानगर यांच्याकडे करणार आहेत
ताजा कलम Amazing management of temple trust and staff
देवस्थानच्या मंदिर दुरुस्ती आणि नवीन निर्माण कार्यात कोट्यावधी रुपयांचचे सोने तत्कालीन ट्रष्टिंनी पायामध्ये पुरल्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते विशेष म्हणजे अहिल्या नगरच्या मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश हे या ट्रस्ट चे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सावळा गोंधळ सुरु असतो याबद्दल भाविकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे विदयमान जिल्हा सत्र न्यायाधीश यात जातीने लक्ष घालतील हि अपेक्षा