2 लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविकांना आता मानधनात वाढ Anganwadi workers

Anganwadi workers : अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन १ एप्रिलपासून वाढ; दोन लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना लाभ.

अंगणवाडी सेविकांना आता मानधनात वाढ | दोन लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना लाभ. Anganwadi workers
अंगणवाडी सेविकांना आता मानधनात वाढ | दोन लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना लाभ.

ग्रामीण बातम्या : Anganwadi workers मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांकडून वारंवार आंदोलन करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने १ एप्रिलपासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील दोन लाख सात हजार १९६१ कर्मचाऱ्यांना होणार आहे.

मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे राज्य सरकारने अखेर त्यांच्या मानधनामध्ये सेविकांना १० हजार, मिनी अंगणवाडी सेविकांना सात हजार.

२०० आणि अंगणवाडी मदतनीसांना पाच हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. २३ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार देण्यात येणारी ही वाढ कायम ठेवण्यात येत आहे, असे महिला व बाल विकास विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले.

Related Post :  SSC MTS Recruitment 2024

केंद्र आणि राज्य सरकारकडून वाढ केली. त्यानुसार अंगणवाडी मानधन. Anganwadi workers

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी. कर्मचारी मानधन वाढ अशी… (रुपयांमध्ये).

  • सध्याचे मानधन
  • अंगणवाडी सेविका ८३२५
  • “मिनी अंगणवाडी सेविका  ५९७५
  • अंगणवाडी मदतनीस ४४२५
  • सुधारित मानधन 
  • अंगणवाडी सेविका  १०,०००
  • “मिनी अंगणवाडी सेविका ७२००
  • अंगणवाडी मदतनीस    ५५००

करण्यासाठी राज्यात ५५३ प्रकल्पातंर्गत ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका, ९७ हजार ४७५ मदतनीस व १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका असे एकूण दोन लाख सात हजार ९६१ मानधनी कर्मचारी कार्यरत आहेत. 

केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांच्या मानधनात वेळोवेळी वाढ करण्यात येते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र सरकारचा हिस्सा ६० टक्के व राज्य सरकारचा हिस्सा ४० टक्के असे प्रमाण आहे.

अशाच प्रकारचे नवनवीन माहिती जाणून घ्यायचे असल्यास ग्रुप ला जॉईन व्हा.

Telegram Link.

Facebook Link.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *