क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी आधार सिंडींग करुन घेण्याचे आवाहन. Bal Sangopan Yojana Maharashtra
अनाथ, एकपालक, निराश्रित, बेघर व अन्य आपत्तीत सापडलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या हेतूने राज्य शासनाकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी आता संबंधित बालकांचे बँक खात्याशी आधार सिडींग करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Bal Sangopan Yojana Maharashtra : बाल संगोपन योजनेचा अर्ज कुठे जमा करावा.
यामुळे योजनेच्या लाभार्थी बालकांचे बँक खात्याशी आधार सिडींग करुन त्याची प्रत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत 2 रा मजला, एस. पी. ऑफीसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे सादर करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एस. वाईंगडे यांनी केले आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल कल्याण समिती अणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याव्दारे बालसंगोपन योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातून मोठ्या प्रमाणात बालकांना योजनेचा लाभ देण्यात येतो.
बाल संगोपन योजनेसाठी कोण कोणते कागदपत्रे लागणार
शासन स्तरावरुन प्राप्त होत असलेला निधी आयुक्तालय स्तरावरुन आहरीत करुन संबंधित बालकांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया आजवर अशीच होत आहे. मात्र आता शासन निर्णयानुसार यात थोडा बदल करण्यात आला आहे.
Bal Sangopan Yojana Maharashtra Apply Link Click Here Information
आयुक्तालय स्तरावरुन आहरीत केलेला निधी थेट बालकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सन 2024-25 पासून सुरु करण्यात आली आहे. यासाठी बालकांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्याशी सिडींग करणे महत्वाचे असून ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही श्री. वाईंगडे यांनी केले आहे.
खालील योजना ची माहिती देखील वाचा.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना | Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024