बुडकी ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्यामुळे नागरीकांना फिरावे लागते खाली हात..
ग्रामीण बातम्या : शिरपुर :- तालुक्यातील बुडकी ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्यामुळे नागरीकांना काम साठी कार्यालयात आल्यावर फिरावे लागते खाली हात असल्याने नागरिकाचे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, ग्रुप बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत नवागांव, चिंचपाणी, लालसिंग पाडा,जुनी बुडकी, तसेच बुडकी असे 5/6 पाड्यातील मुख्य ग्रामपंचायत बुडकी येथे असुन शासकीय कामासाठी ह्या 5 पाड्यातील व्यक्तींना बुडकी ग्रामपंचायत ला जाऊन सह्या,शिंके, तसेच विविध कागदपत्रे साठी जाणे लागत असते पण तीथे गेल्यावर शासकीय कार्यालये हे बंद अवस्थेत असल्याचे दुश्य दिसुन येते…
ग्रामसेवक हे शिरपुर ला राहत असल्यामुळे तसचे त्याच्या कडे बुडकी गधडदेव असे मिळून दोन गावे असल्यामुळे बुडकी ग्रामपंचायत ला मंगळवार व शुक्रवारी येत असल्याने बाकी चा ५ दिवशी त्याच्या सह्या व कामा साठी नागरीकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात फिरावे लागते..
आज दि:- ३/४/२०२३ रोजी जितेंद्र पावरा यांनी मासिक सभेला बसण्याची परवानगी मिळण्याबाबत मा.ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) बुडकी यांना अर्ज देण्यासाठी गेले असते.
ग्रामपंचायत कार्यालयात हे बंद असल्यामुळे त्यांनी ग्रामसेवक यांच्या शी फोन द्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की लिपिक चा पेपर आहे. बाहेर असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी हे कार्यालयात येत आहे.
असे सांगण्यात आले मग काय ग्रामपंचायत कर्मचारी आल्यावर त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात उघडण्यास सागितले असता कार्यालयाची चाबी हि लिपीक शोभत घेऊन गेले असल्याचे सांगुन ते निघून गेले असल्याने शेवटी जितेंद्र पावरा यांनी सरपंच व उपसरपंच यांच्या शी संपर्क साधुन मा.ग्रामविकास अधिकारी (बुडकी) याच्या कडे मासिक सभेला बसण्याची परवानगी मिळण्याबाबत अर्ज सादर करण्यात आला….
या वरुन असे प्रश्न उपस्थित होत आहे की, शासकीय कार्यालयाची चाबी लिपीक शोभत घेऊन फिरत असेल तर मग काय?..
ग्रामसेवक शिरपुर ला जरी राहत असेल तर बाकी चे कर्मचारी नाही का?… तसचे ग्रामपंचायत कामासाठी जर फोन करुन ग्रामपंचायत उघडण्यात येत असले तरी नेमके कार्यकाय काय कार्य करत असेल…….
लवकरच ग्रामसेवक चे हजेरी पत्रक रजिस्टर वही चेमाहिती मांगण्यात येणार आहे. जितेंद्र पावरा.
Leave a Reply