Gramin Batmya

weather today Live

जात प्रमाणपत्र पडताळणी Caste Validity Certificate
Tribal Area News

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीकरिता अर्ज करावेत. Caste Validity Certificate

Caste Validity Certificate: जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष दिनकर पावरा यांनी कळविले आहे की, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीकरिता वृत्त क्र.143/2024 दि.16 फेब्रुवारी 2024 नुसार अर्ज करावेत. ( Caste Validity Certificate )

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीकरिता अर्ज करावेत.
Caste Validity Certificate

Caste Validity Certificate नोंदणी अर्जासोबत काय जोडणे आवशक आहे ?

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जोडणे अत्यावश्यक आहे.  

यानुषंगाने सन 2024 2025 या शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी पदविका, डिप्लोमा, पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर व्यवसायिक अभ्यासक्रम इ.करिता प्रवेश घ्यावयाचे आहेत,

जात प्रमाणपत्र पडताळणी Official Website कोणती आहे?

अशा इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जात पडताळणीकरिता https://etribevalidity.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा व प्रस्तावाची प्रत प्रत्यक्ष समिती कार्यालयास जमा करावी, असे आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

हेही वाचा : 👉👉 जातीचा दाखला कसा काढावा 

जात प्रमाणपत्र पडताळणी काढण्यसाठी काही अडचण असल्यास तेथे करा होणे ?

अर्जदाराने जात प्रमाणपत्र पडताळणीचा परिपूर्ण अर्ज दिलेल्या मुदतीत सादर न केल्यास जात वैधता प्रमाणपत्राअभावी होणाऱ्या विलंबास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, ( Caste Validity Certificate ) याची नोंद घेण्यात यावी तसेच अर्जदारास जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत काही अडचणी असल्यास ठाणे समिती कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 022-25302930 वर संपर्क करावा, असेही समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष दिनकर पावरा यांनी कळविले आहे.

हेही वाचा : 👉👉 उत्पन्न चा दाखला कसा काढावा 

Important Information Links

Official Website Link      येथे क्लिक करा 
Related Notification       येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp        येथे क्लिक करा 
Join Us On Telegram      येथे क्लिक करा 
Join Us On Instagram       येथे क्लिक करा 
Join Us On Facebook      येथे क्लिक करा 

1 COMMENTS

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !