शिरपूर तालुक्यातील नारीशक्ती डॉ.वैशाली पावरा ह्यांचे संघर्षातून एमबीबीएस पदवी संपादन.! Dr. Vaishali Pawara
ग्रामीण बातम्या : शिरपूर तालुक्यातील बोराडी परिसरातील अतिदुर्गम कार्यक्षेत्रातील आदिवासी गाव असलेले जामण्यापाणी येथील सून असलेले डॉ.संजय पावरा ह्यांच्या धर्मपत्नी डॉ.वैशाली रमेश पावरा ज्यांनी अहोरात्र एक करून, शून्यातून हे सारं निर्माण केलं.
एक प्रेरणादायी अशी कहाणीच म्हणावी लागेल लग्न झाल्यानंतर ‘घरात चूल आणि मूल’ ही धारणा व जिम्मेदारी प्रत्येक समाजात असते पण डॉ.संजय पावरा व त्यांचा परिवार ह्यांनी आपल्या अर्धांगिनीसाठी आपल्या सूनेसाठी त्यांच्या व परिवाराच्या भविष्यासाठी जे पाऊल सर्वांनी उचलले व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आठ महिन्याचे गरोदर असतांना फायनल वर्षाची परीक्षा डॉ.वैशाली पावरा ह्यांनी यशस्वी पार पाडून यश संपादन करून त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास आणले. ( Dr. Vaishali Pawara )
समस्त पुरुषप्रधान संस्कृतीतील व आदिवासी समाजातील एक प्रेरणादायी व समाजातील आदर्श उदाहरण आहे ह्यांच्याकडून समाजाने व जगाने आदर्श ठेवून येणाऱ्या पिढीस एका नव्या प्रवाहात आणले जाईल.!
आदिवासी नारी शक्ती ह्यांच्या यशाला बघून समाज म्हणून आमचे ऊर भरून आले येणाऱ्या काळात आपण आपल्या समाजातील अनेको गरीब गरजूंची सेवा द्याल हीच अपेक्षा व हाच आमचा आशीर्वाद.
शिरपूर तालुक्यातील अनेक पदाधिकारी, वरिष्ठ लोकप्रतिनिधी, परिसरातील लोकप्रतिनिधी, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, माडा संघटना, पावरा डॉक्टर्स टीम, आदिवासी भागातील अनेकांनी ह्या यशाबद्दल त्यांना आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत.
ग्रेट आदिम अभिनंदन, पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
Related Informational Post :
- The great man Dr. Babasaheb Ambedkar | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- आदिवासी समाजाचे नाव गौवरवविणाऱ्या चुनीलाल पावराचा जीवनपरिचय वाचा.
- Journalist पत्रकार बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या.