Extra money has to be paid for gas cylinder at home : डिलिव्हरी बॉय मागतात वरुन पैसे: नागरिक टाळतात तक्रार. ग्राहकांनी चुप्पी साधू नये, घरपोच गॅस सिलिंडरसाठी जादा पैसे मोजावे लागत असेल तर तक्रार कराच आता. ! म्हणूनच लोकं देखील सांगतात .
Extra money has to be paid for gas cylinder at Home : घरपोच गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागतात जादा पैसे !
गॅस एजन्सीकडून सिलिंडरसाठी जेवढे बिल आकारले जाते, त्यामध्ये घरपोच सेवेचे पैसे देखील समाविष्ट असतात. त्यानंतरही घरपोच गॅस सिलिंडरसाठी ठरलेल्या रकमेशिवाय डिलिव्हरी बॉय २० ते ३० रुपये जास्त आकारतात. यासंदर्भात हेल्पलाइनवर तक्रार करता येते. परंतु उगाच वाद नको म्हणून अनेक ग्राहक या हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे टाळतात.
सिलिंडर घरपोच देत असलेल्या बिलात डिलिव्हरी बॉयचे कमिशन अथवा पगाराचा देखील समावेश असतो. त्यानंतरही ग्राहकांकडून प्रति सिलिंडर २० ते ३० रुपये वसूल करतात. अनेकदा ते ग्राहकांसोबत वाद घालतात. अखेर वाद नको म्हणून ग्राहकही डिलिव्हरी बॉयला बिलातील रकमेव्यतिरिक्त जास्त रक्कम देतात. घरपोच सिलिंडरसाठी जास्तीचे पैसे कशाला, असा गृहिणींचा सवाल आहे. जास्त पैसे मागणारे डिलिव्हरी बॉय आणि वितरकांची थेट कंपनीकडे पैसे जास्त घेत
असल्यास तक्रार कोठे कराल? Extra money has to be paid for gas cylinder at home
- भारत गॅस : १८००२२४३४४
- इंडेन गॅस : १८००२३३३५५५
- हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी): १८००२३३३५५५
या क्रमांकावर ग्राहकांना आपली तक्रार करता येते. मात्र तक्रारींचे प्रमाण खूपच कमी आहे.
- गॅस सिलिंडरची किमत ९२३ रुपये आहे. गॅस सिलिंडर डिलिव्हरी करणाऱ्याला १५० रुपये दिले की, तो उर्वरित पैसे पूर्णपणे परत देत नाही. तंतोतंत पैसे दिले तरी आणखी पैसे मागतात. –आरती पाटील, गृहिणी
- सिलिडरच्या किमतीत घरपोच सेवेचे पैसे समाविष्ट असतात. अतिरिक्त पैसे मागणे हा प्रकार चुकीचा आहे. परंतु, विनाकारण वाद नको म्हणून दरवेळी १० ते २० रुपये देऊन मोकळे होतो. –सीमा चौधरी, गृहिणी
- सिलिंडरचे वजन मोजून घ्या.. ग्राहकांना सिलिंडरची डिलिव्हरी देण्यापूर्वी वजन करून त्यानंतरच ते ग्राहकांना द्यावे. सिलिंडर घेऊन –अनिकेत पाटील, ग्राहक
आपण मोजतो त्या पैशात घरपोच सेवा अंतर्भूत असते, हे माहीत असूनही डिलिव्हरी बॉयला अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. तक्रार करता येते. शिवाय, सिलिंडर पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडे वजनकाटा नसतोच. यामुळे सिलिंडर पूर्ण १४ किलोचे मिळेलच याची कोणत्याही प्रकारची शाश्वती नसते.
जाणाऱ्या वाहनात वजन मशीन असणे आवश्यक आहे. जर ग्राहकाने सिलिंडरचे वजन करून मागितले तर डिलिव्हरी बॉयला ते करून देणे अनिवार्य आहे. मात्र, अशी मागणी कुणीही करीत नाही. शहरात सिलिंडर ९०८ रुपयांना गत काही महिन्यांपासून घरगुती सिलिंडरचे दर कमी झाले असून, सध्या १४ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरसाठ ९०८ रुपये मोजावे लागत आहेत.
या व्यतिरिक्त घरपोच सिलिंडरसाठ अतिरिक्त २० ते ३० रुपये मोजा लागतात. सबसिडी ४ रुपये शासनाकडून सिलिंडरवर सबसिड दिली जाते. काही वर्षांपासून सबसिडीट मोठी घट झाली असून, आज रोजी रुपयांची सबसिडी ग्राहकांच्या खात्या जमा होते. हे अनुदान वाढविण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा :
- Extra money has to be paid for gas cylinder at Home काय आहे .लिंक
- चौकशी कक्षाचा गजब कारभार. लिंक
- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियम धाब्यावर लिंक
- कोरोनानंतर आता नवे संकट! लिंक
ग्राहकांनी चुप्पी साधू नये ! ( Extra money has to be paid for gas cylinder at home )बिलाच्या रकमेत घरपोच सेव अंतर्भूत असते. त्यासाठी अतिरिक्त पैस देणे बंधनकारक नाही. घरपोच सेवेच अतिरिक्त पैसे मागणे चुकीचे आहे ग्राहकांना समाधानकारक सेव देण्याला आमचे प्राधान्य असते यासंदर्भात कुणाची तक्रार आली त आम्ही त्याचे निराकरणही करतो यासंदर्भात ग्राहकांनी चुप्पी साधू नये असे मत गॅस एजन्सीच्या संचालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले.
Related News :
- Police criminal News | पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न
- Traffic Police | देशातला पहिला दंड ट्रॅफिक पोलिसाने मारला दहा हजार चा फाईन
- पोलीसांची थर्ड डिग्री म्हणजे काय? /
- New Scheme Of Maharashtra
Leave a Reply