fake certificate MBBS |
आदिवासींच्या बोगस दाखल्यावर एमबीबीएसला मिळाला प्रवेश.
खोटा दाखलाच्या मदतीने दस्तावेज तयार करून आदिवासी समाजात घुसखोरी करत शासकीय एमबीबीएसला प्रवेश मिळवणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील नऊ व्यक्तींवर अकोले जिल्हा अहमदनगर येथे शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
अकोले तालुक्यातील आदिवासींच्या आडनावाच्या आधार घेऊन आदिवासी मध्ये घुसखोरी करून आदिवासीच्या योजनेवर डल्ला मारत बोगस आदिवासी ची चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी राज्यातील आदिवासी संघटनांनी केली आहे.
बोगस आदिवासी दाखला मिळणार या लक्ष्मण शंकर कदम राहणार आंबा तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील नऊ जण अनुसूचित जाती जमातीचे दाखले संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी रद्द करीत 15 जून 2022 रोजी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे सूचित केले होते.
मात्र गुन्हा दाखल होत नव्हता आदिवासी संघटनांनी उपोषणाचा इशारा दिला व आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर 22 जुलै रोजी अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व हिंगोली जिल्ह्यात लक्ष्मण कदम या शिक्षकांनी चक्क खापर पणजोबा व काही बनावट नाते वाईक अकोल्यातून चोरले असल्याचे उघड झाले.
कदम यांनी अकोले तहसील मधून व्यक्तींचे आदिवासी ठाकर जमातीचे दाखले खाडाखोड करून मिळवले होते खोटे वंशावळ तयार करून खोटे सत्य प्रतिज्ञापत्र अकोले तहसील मध्ये बनवले गेले.
याबाबत जात पडताळणी समितीच्या संशोधन पथकाने सर्व पुरावे शोधून काढले लक्ष्मण शंकर कदम यांनी स्वतःच्या सेतू चालक भाऊ जगदीश शंकर कदम यांच्या मदतीने राहुरी येथील पारधी आडनावाचा आदिवासी व्यक्तीला हाताशी धरून राहुरी येथील आदिवासी असल्याचे खोटे दाखले व शपथपत्र बनवले.
तसेच नावात बदल करून गॅझेट मध्ये नोंद करून घेतली त्यामुळे लक्ष्मण शंकर कदम चा लक्ष्मण शंकर पत्रे झाला आदिवासी आडनाव लावून घेतले की जमात पडताळणी समित्या सहज उपस्थित या हेतूने हेच बनावट दस्तावेज जोडून गॅझेटमध्ये बदल करून घेतले अकोले तालुक्यात अप्रोड अकोले आदिवासी ठाकर उन्नती मंडळ आणि आदिवासी ठाकर नोकरवर्ग व ठाकर समाज उत्कर्ष संस्थेच्या सतर्क कार्यालयांनी पाठपुरावा केल्याने हे बनवेगिरी उघड झाली आहे.
सेतू कार्यालयातून काढले ठाकर जमातीचे दाखले.
जातीचे दाखले घेताना तालुका कार्यालयात ऑनलाइन प्रक्रिया सेतू मार्फत केली जाते स्वतःच्या भाऊ जगदीश शंकर कदम हिंगोली हा सुविधा सेतू कार्यालयात संचालक असल्याने त्यांनी अकोले येथील सेतू चालका करणी आदिवासी ठाकर जमातीचे दाखले काढले.
त्याने जिल्हा परिषद शाळेच्या दाखल्यावर खाडाखोड करून नाव बदलले व झेरॉक्स काढले अपलोड करून अकोले सेतू चालकाने लक्ष्मण शंकर कदम यांच्या नऊ नातेवाईकांमध्ये ठाकर जमातीचे दाखले तहसील मधून दिलेले दाखले देणारे व दाखले घेणारे हे दोघेही अनुसूचित जात पडताळणी अधिनियमा नुसार दोषी असून त्यात सहभाग असणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आदिवासी संघटनेच्यावतीने डॉक्टर वाळू भांगरे मदन पथवे अरुण खापर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
यात कुटुंबातील सर्वांचा सहभाग.
लक्ष्मण यांचा मुलगा वैभव कदम यांनी सुद्धा स्वतःच्या आडनाव पत्रे असे आदिवासी लावून खोटे खाडाखोड केलेली विविध दाखले जोडून चक्क पडतानी समितींना फसवत जात वैधता सुद्धा मिळवण्याची बाप उघडकीस आली आहे.
लक्ष्मण शंकर कदम यांची मुलगी शिवानी कदम हिने देखील बोगस दाखले न्यायालयात दाखवून दिशाभूल केली व जे जे मेडिकल कॉलेज मुंबई येथे एमबीबीएसला प्रवेश मिळवला याप्रकरणी ग्याजेट आधार कार्ड रेशन कार्ड सातबारा 1950 महसूल पुरावा सर्व बनावट असल्याचे तपासात पुढे आले आहे किंवा अनुसूचित जाती जमाती पडताळणी समितीची पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी चांगली कामगिरी करत बनावट आदिवासी बदलण्याचे प्रकरण उजेडात आणले आहे.