कांदा चाळ अनुदान योजना 2024 आजच ऑनलाईन अर्ज करा. Kanda Chal Anudan Yojana

 Kanda Chal Anudan Yojana
Kanda Chal Anudan Yojana

Kanda Chal Anudan Yojana 2024 | कांदा चाळ अनुदान योजना 2024

कांदा चाळ योजना 2024 : महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकरी हा सर्वसाधारणपणे  कांदा जमिनीवर पसरून किंवा स्थानि रीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदा पिकाची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा मोठ्या प्रमाणावर नसतो आणि त्याचे नुकसान राहते. तसेच कांद्याची प्रत आणि टिकाऊपणा यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो.

कांदा चाळीच्या उभारणीमुळे कांद्याची प्रत राखली जाते आणि तो कांदा दीर्घकाळ टिकवला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा अधिक नफा मिळू शकतो. त्यामुळेच कांदाचाळ उभारणी कडे शेतकऱ्याचा कल हा वाढत झालेला दिसून येतो.

कांदा चाळ अनुदान किती? How much is the Kanda Chal subsidy?

मेट्रिक टन नुसार तुम्हाला कांदा चाळीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून ५, १०, १५, २० व २५ मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५०% व कमाल ३,५००/- रुपये प्रति मेट्रिक टन या क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिले जाते.

कांदा चाळ अनुदानाचे उद्दिष्ट काय? What is the objective of Kanda Chal Subsidy?

कांदा चाळ तुम्ही जेव्हा उभारल्याने शेतकर्‍याला कांद्याच्या साठवणुकीत नुकसान कमी होईल आणि अधिक नफा मिळवता येईल तेव्हा.

Related Scheme :

हंगामानुसार कांद्याची आवक वाढून कांद्याचे भाव कोसळतात तसेच हंगामा व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा पडून कांद्याचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढतात. अशा समस्येवर अंशतः नियंत्रण मिळवणे. कांद्याची साठवणूक करून अधिक नफा मिळवणे.

कांदा चाळ अनुदान पात्रता काय? What is the Kanda Chal Grant Eligibility?

कांदा चाळ या अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करताना शेतकऱ्याच्या अर्जदार शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे बंधनकारक आहे.

 • ७/१२ उतारा वर नोंद असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे गरजेचे आहे.
 • कांदा चाळ अनुदान लाभ कोण घेऊ शकतो?
 • वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी
 • शेतकऱ्यांचा गट स्वयंसहाय्यता गट
 • शेतकरी महिला गट
 • शेतकऱ्यांची उत्पादक संघ
 • नोंदणीकृत शेती संबंधित संस्था
 • शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था
 • सहकारी पणन संघ

कांदा चाळ अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते ? – What are the required documents for Kanda Chal Subsidy Scheme?

 • सातबारा उतारा
 • आधार कार्डची छायांकित प्रत
 • आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
 • संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र २) PDF 

कांदा चाळ अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ? Where to apply for Kanda Chal Subsidy Scheme?

कांदा चाळ या अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या आणि पात्र अर्जदारांनी या योजनेसाठी महा डी बी टी फॉर्मर या ऑनलाइन संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावीत.

कांदा चाळ योजनेसाठी पूर्व संमती पत्र. Prior Consent Letter for Kanda Chal Scheme

कांदा चाळ योजनेसाठी पूर्व संमती पत्र आलेल्या शेतकऱ्याला सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र ४ बंध-पत्र तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये सादर करावे लागेल. आराखड्यात पूर्वसंमती पत्रासोबत  दिलेल्या तांत्रिक निकषानुसार कांदा चाळीची उभारणी करणे बंधनकारक असणार आहे.

कांदा चाळ या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला सविस्तर प्रस्ताव सादर करावा लागेल. कांदाचाळ उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना लेखी स्वरुपात कळवावे लागेल. ( Kanda Chal Anudan Yojana )

Related Scheme :

Conclusion :  

आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला कांदा चाळ अनुदान योजने विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप तुम्हाला काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक कार्यालय यांच्याशी संपर्क करावा आणि तुमच्या शंकांचे निरसन करावे. ( Kanda Chal Anudan Yojana) 

Kanda Chal Anudan Yojana PDF  :

Related Download PDF Link 
Facebook Link 
Telegram Link 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *