लोकशाही दिन परिपत्रके व शासन निर्णय PDF / Lokshahi Deen In Marathi

Lokshahi Deen In Marathi

लोकशाही दिन परिपत्रके व शासन निर्णय PDF : सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. प्रसुधा २०११/प्र.क्र.१८९/११/१८-अ दि. २६ सप्टेंबर २०१२ नुसार सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी / अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणुन “लोकशाही दिन” जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येतो. चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया , ( Lokshahi Deen In Marathi )

Lokshahi Deen In Marathi
Lokshahi Deen In Marathi

लोकशाही दिन परिपत्रके व शासन निर्णय PDF / Lokshahi Deen In Marathi

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी / अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून “लोकशाही दिन जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो. लोकशाही दिनाच्या कार्यपध्दतीबाबत संदर्भाधीन परिपत्रकान्वये शासनाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना विहित केलेल्या आहेत.

  •  1) लोकशाही दिनासंदर्भात सर्व सूचना एकत्रितपणे निर्गमित कराव्यात व त्यासंबंधीची कार्यपध्दती सुलभ व्हावी, तसेच “लोकशाही दिन” हा तालुका स्तरावर देखील राबविण्यात यावा, ही बाब शासनाच्या विचाराधीन होती.
  • २. लोकशाही दिनासंबंधी यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेली परिपत्रके अधिक्रमित करून, स्तरांवरील लोकशाही दिनाच्या कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे एकत्रित मार्गदर्शक तत्वे विहित करण्यात येत आहेत :
  • ३.”लोकशाही दिन ” जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त स्तर / विभागीय आयुक्त स्तर व मंत्रालय स्तरावर राबविण्यात यावा.
  • ४. यापुढे “लोकशाही दिन ” तालुका स्तरावर देखील राबविण्यात यावा.

विभागीय लोकशाही दिन आयोजन – Lokshahi Deen In Marathi

  • विभागीय स्तरावर प्रत्येक महिन्याचा दुसन्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते.
  • प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणार कामकाजाचा दिवशी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
  • विभागीय स्तरावरील लोकशाही दिन मा. विभागीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात येतो.

लोकशाही दिनांत अर्ज कसा करावा/अर्जाची पध्दत / Lokshahi Deen In Marathi

  • अर्ज विहीत नमुन्यात असावा. (प्रपत्र )
  • तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी.
  • चारही स्तरांवरील लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात १५ दिवस आधी २ प्रतीत पाठविणे आवश्यक राहील.
  • तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल.
  • जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनांत
  • विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनांत अर्ज करता येईल.

कोणत्या विषयावरील अर्ज स्वीकारले जात नाहीत / Lokshahi Deen In Marathi

  • न्याप्रविष्ठ प्रकरणे
  • राजस्व / अपिल्स
  • सेवाविषयक आस्थापना विषयक बाबी

विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज / Lokshahi Deen In Marathi

  • अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्यांच विषया संदर्भात केलेले अर्ज
  • तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर.
  • वरिल प्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्विकृत करता येऊ शकणार नाहीत असे संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाही साठी ८ दिवसात पाठविण्यात येतात व त्यांची प्रत अर्जदारास पृष्ठांकीत करण्यात येते.

लोकशाही दिन केव्हां होणार नाही.

  • ज्या ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकी करिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनांचे आयोजन करण्यात येत नाही.
  • विधिमंडळ अधिवेशन काळात मंत्रालय स्तरावरील “लोकशाही दिन होणार नाही.

लोकशाही दिनात अर्ज करणेकामी लागणारे प्रपत्र पुढील प्रमाणे आहे.

प्रपत्र- १ (अ) लोकशाही दिनात अर्ज सादर करण्याचा नमुना
• प्रपत्र- १ (ब) जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज सादर करण्याचा नमुना व आवश्यक कागदपत्रे.
• प्रपत्र १ (क) विभागीय आयुक्त लोकशाही दिनात अर्ज सादर करण्याचा नमुना व आवश्यक कागदपत्रे.
• प्रपत्र १ (ड) मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करण्याचा नमुना व आवश्यक कागदपत्रे
Lokshahi Deen In Marathi
Lokshahi Deen In Marathi

लोकशाही दिन पालक सचिवांची नेमणुक परिपत्रके व शासन निर्णय  PDF / Lokshahi Deen In Marathi

Lokshahi Deen In Marathi : Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Lokshahi Deen In Marathi pdf येथे क्लिक करा 
Related Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !