Money in bank or pocket. |घरपट्टी व पाणीपट्टी माहिती देण्यास ग्रामसेवक करत आहेत. टाळाटाळ.

घरपट्टी व पाणीपट्टी ची माहिती देण्यास ग्रामसेवक करत आहेत टाळाटाळ. माधवराव दोरीक . माहिती अधिकार कार्यकर्ता. बलकुवे.

ग्रुप ग्रामपंचायत मुखेड सह बलकुवे येथे नागरीकांन कडुन घरपट्टी व पाणीपट्टी वसुली सुरू परंतु किती पैसे जमा झालेत याची माहिती देण्यास ग्रामसेवक करत आहेत. टाळा-टाळ पैसे बैंकेत कि खिशात.

तालुका शिरपूर :  माधवराव फुलचंद दोरीक मु पो बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे ग्रुप ग्रामपंचायत मुखेड सह बलकुवे येथे दिनांक 28/07/2022 रोजी ग्रामसेवक यांचे नावाने माहिती अधिकार अर्ज करुन बलकुवे येथे जमा झालेली ग्रामनिधी संबधीत 3 मुद्देची माहिती मागितली होती. 

१) जमा झालेली ग्रामनिधी 

२)त्यांचे पावती पुस्तक 

३) ग्रामनिधीचे बैंक पासबुक चे झेरॉक्स प्रत. 

अशी माहिती मागीतली होती परंतु ग्रामसेवक यांनी माहिती अधिकार कायदा 2005 चे कलम 7/1 नुसार तिस दिवसात माहिती देणे किंवा अर्ज फेटाळून लावणे बंधनकारक होते.

परंतु त्यांनी माहिती न दिल्याने मी दिनांक 07/09/2022 रोजी मा गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे येथे माहिती अधिकार कायदा चे कलम 19/1 नुसार प्रथम अपील दाखल केले. तरी त्याची सुनावणी दिनांक 10/10/2022 रोजी झाली त्या संदर्भात दिनांक 13/10/2022 रोजी मा सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक यांना 15 दिवसात माहिती पुरविण्याचे आदेश दिले .

परंतु ग्रामसेवक आपला पदाचा दुरुपयोग करून आपली मनमानी पद्धतीने व माहिती दिल्यास आपला भ्रष्टाचार उघड होऊ शकतो या भितीने , आज दिनांक 04/11/2022 रोजी पर्यत त्या संदर्भात माहिती देण्यास हेतुपूर्वक जाणुनबुजून टाळाटाळ केली आहे.

तरी जनता काबाडकष्ट करून आपल्या घराची घरपट्टी व पाणीपट्टी चा कराचा भरणा करत असतात जर ते कराचा भरणा करत असतात. तर त्यांना त्याचा हिशोब विचारण्याचा संविधानाने दिलेला अधिकार सुद्धा आहे, परंतु आज पर्यंत माहिती न मिळाल्याने सदर ग्रामनिधी चे पैसे बैंकेत कि स्वताच्या खिशात हा प्रश्न निर्माण होतो , 

तरी त्या संदर्भात मी त्यांना दिनांक 03/11/2022 रोजी स्मरण पत्र देऊन माहिती 7 दिवसात पुरवण्यासाठी मागणी केली आहे.

घरपट्टी व पाणीपट्टी माहिती देण्यास ग्रामसेवक करत आहेत. टाळाटाळ.
घरपट्टी व पाणीपट्टी माहिती देण्यास ग्रामसेवक करत आहेत. टाळाटाळ.


तरी 7 दिवसात माहिती न मिळाल्यास  मा गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर ,मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे ,मा विभागीय आयुक्त नाशिक, मा सचीव, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक विभाग यांचे कडे तक्रार दाखल करणार आहे अधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करणार आहे स्मरण पत्र नुसार त्यांना आठवण करून दिली आहे तरी आता ग्रामसेवक माहिती देतात कि लपवतात बघु पुढे काय होते

माधवराव दोरीक . माहिती अधिकार कार्यकर्ता. बलकुवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !