अनुसूचित क्षेत्रात सरपंच बरोबर उपसरपंचही पेसा कायद्यानुसार आदिवासीच हवा : Pesa Kayada Nusar Sarpanch Adivasi Hava

अनुसूचित क्षेत्रात सरपंच बरोबर उपसरपंचही पेसा कायद्यानुसार आदिवासीच हवा : Pesa Kayada Nusar Sarpanch Adivasi Hava

Pesa Kayada Nusar Sarpanch Adivasi Hava : अनुसूचित क्षेत्रात सरपंच बरोबर उपसरपंचही पेसाकायद्यानुसार आदिवासीच हवा. संपूर्ण माहिती वाचा :

अनुसूचित क्षेत्रात सरपंच बरोबर उपसरपंचही पेसा कायद्यानुसार आदिवासीच हवा : Pesa Kayada Nusar Sarpanch Adivasi Hava

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि पेसाकायदा 1996 : Pesa Kayada Nusar Sarpanch Adivasi Hava

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 नुसार उपसरपंच हे पद आरक्षित/राखीव नसल्याची तरतुद असली तरी पेसाकायदा 1996 , सरपंच आणि उपसरपंच यात भेद करीत नाहीं म्हणून अनुसूचीत क्षेत्रांतील एखाद्या पेसा ग्रामपंचायतींमध्ये 50% पेक्षा जास्त किंवा कमी आदिवासीलोकसंख्या असली तरी त्या ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंच आदिवासीच असायला हवेत .

Pesa Kayada Nusar Sarpanch Adivasi Hava : ग्राम पातळी वरील ग्राम पंचायती

पेसाकायदा ,1996च्या कलम4.(छ) च्या परंतुका नुसार ग्राम पातळी वरील ग्राम पंचायतीच्या चेअरमन/ अध्यक्ष पदाच्यासर्व जागा आदिवासींसाठी राखून ठेवण्यात येतीलअशी तरतुद आहे म्हणजे एखाद्या पेसा ग्रामपंचायतींमध्ये50%पेक्षाकमी आदिवास लोकसंख्या असली तरी त्याग्रामपंचायतीत सरपंच/उपसरपंच आदिवासीच असेल. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 मधील कलम 30 A आणि 30 A(2)नुसार उपसरपंच यांच्या निवडणूकीची कार्यपध्दती विषद करण्यात आलेली आहे.

सरपंच उपस्थित राहण्यास असमर्थ असल्यास. उपसरपंचाची उपस्थित असेल : Pesa Kayada Nusar Sarpanch Adivasi Hava

उपसरपंचाच्या निवडणूकीकरीता अपरिहार्य कारणास्तव सरपंच उपस्थित राहण्यास असमर्थ असतील तर जिल्हाधिकारी यांनी सदर कारणाची खातरजमा करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 चे कलम 33 मधील पोट कलम 6(4) मधील तरतुदीस अनुसरुन तात्काळ पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती केली पाहीजेत.जेणे करून विहित कालावधीमध्ये पंचायतीचे गठन होणे शक्य होईल. उपसरपंचाची निवडणूक ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेणे व उपसरपंच यांची निवड करणे कायदयाने बंधनकारक असल्याने उपसरपंच निवडणूकीचे अध्यक्षस्थान भूषवून त्याप्रमाणे कार्यवाही करणे हे सरपंच यांच्या कर्तव्याचा भाग आहे.

उपसरपंच पदासाठी  इच्छुक उमेदवारांना अर्ज | Pesa Kayada Nusar Sarpanch Adivasi Hava

उपसरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करावे लागतात अर्जाचे नमुने निवडणूक अधिकाऱ्याकडे मोफत मिळतात. निवडणुकीच्या वेळी पूर्वी सुमारे दोन तास अगोदर उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातात . त्यानंतर दोन तासांनी निवडणूक अधिकारी सभा सुरू करतात या पहिल्या सभेचे अध्यक्ष निवडणूक अधिकारी असतात.

निवडणूक अधिकारी सभेचे गाव ठिकाण वेळ तारीख जाहीर |  Pesa Kayada Nusar Sarpanch Adivasi Hava

ही सभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दुपारी घ्यावी लागते निवडणूक अधिकारी सभेचे गाव ठिकाण वेळ तारीख जाहीर करतात .ते अर्जाची छाननी करतात कोणाला उमेदवारी मागे घ्यायची आहे असे विचारून उमेदवारी मागे घेण्याची संधी देतात.

ग्रामपंचायत मतदान पद्धती | Pesa Kayada Nusar Sarpanch Adivasi Hava

सदस्यांच्या विनंतीप्रमाणे हात वर करून खुले मतदान होते किंवा गुप्त मतदान पद्धतीने मतदान होते व उपसरपंच यांची निवड होते. मग निवडणूक अधिकारी निवडून आलेल्या सदस्यांची नवे जाहीर करतात एवढेच काम या पहिल्या सभेत होते. उमेदवारी मागे घेण्याची वेळ संपल्यावर एकच उमेदवार उरला तर त्याचे नाव जाहीर करतात अनेक उमेदवार असतील तर निवडणूक घेतात. म्हणून सरपंच उपस्थित नसल्यास उपसरपंच ची हजेरी निच्छित राहील. अशातच

सभा बरखास्त कशी होते. Pesa Kayada Nusar Sarpanch Adivasi Hava

या सभेत याशिवाय दुसरी कामे घेता येत नाहीत त्यानंतर सभेचे अध्यक्ष सभा बरखास्त करतात.सभेचा कार्यवृत्तांत सात दिवसांच्या आत पंचायत समितीच्या सभापती ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व जिल्हा अधिकारीयास पाठवण्यात येतो. उपसरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार असेल व सदर निवडणूकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल.

अनुसूचित क्षेत्रात उपसरपंच पद पेसाकायद्यानुसार आदिवासी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागेल. Pesa Kayada Nusar Sarpanch Adivasi Hava

निवडणुकी नंतर पहिली ग्राम सभा सोडली तर अनुसूचित क्षेत्रात सरपंच , उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष राहू शकत नाही. ग्रामसभा आपल्या सदस्या मधून एकाची सर्वसंमतीने अध्यक्ष म्हणुन निवड करेल . अनुसुचित क्षेत्रात वरील तरतुद सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी पाळली तरी ग्राम सभेचे काम राजकीय हस्तक्षेप विरहीत होईल. एकनाथ भोये(8975439134) ता. पेठ जि. नाशिक.

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. तसेच आपल्या क्षेत्रात काही घटना घडल्यास आमच्या सोसिअल मेडिया ग्रुप ला शेअर करू शकता ? आणि आपल्या संबंधित मित्र / मैत्रिणी यांना शेअर करू शकता.

Related Notification Information :  Click Here
Official Website Information  Click Here
Information Government Scheme  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !