नमस्कार मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अपडेट पिक विमा योजना एक रुपया मध्ये पिक विमा भरणे मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला होता एक रुपया पिक विमा भरण्याला राज्य शासनाने जीआर काढून मंजुरी दिली आहे.एक रुपया पिक विमा भरण्यासाठी मार्ग मोकळा.
प्रस्तावना –
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भ क्र.(१) च्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रं. १३.१.१० अन्वये जर राज्य शासन शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याच्या वाट्याची रक्कम भरणार असेल तर, ईलेक्ट्रॉनिक ट्रैकिंग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत विमा हप्त्याच्या ऐवजी किमान १ रुपयाचे टोकन अनिवार्यपणे आकारले जाईल.
हेही वाचा – शासन निर्णय PDF पहा.
तद्नुषंगाने, मा. वित्त मंत्री महोदयांचे सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतक-यांना केवळ रु.१ भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “एक रुपयात पीक विमा” या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्याकरीता वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांनुसार शेतक-यांना केवळ रु.१/- भरून पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याबाबतच्या प्रस्तावास दि.३०.०५.२०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यास अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे….
शासन निर्णय :-
1) सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.१ भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन २०२३-२४ पासुन राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरीता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय क्रमांक प्रपीवियो-२०२३/प्र.क्र.३४/११-
३. सर्व समावेशक पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता खालील जोखमीच्या बाबींचा समावेश करुन राबविण्यात येईल:-
Leave a Reply