अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांनो, अर्ज करा अन् घ्या योजनेचा लाभ :

विशेष पंधरवाडा मोहीम : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी मोहीम स्वरुपात राबविण्याकरिता तसेच वनपट्टे जमीन असलेल्या आदिवासी कुटुंबांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता क्षेत्रीय स्तरावरून २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष पंधरवाडा मोहीम सुरू झाली आहे. (SC and ST farmers, apply and avail the benefits of the scheme )

या मोहिमेत कृषी विभागाच्या विविध योजनांचे लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https:// mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकाचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याकरिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेचा घेता येणार लाभ

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत पुष्पोत्पादन विकास कार्यक्रम- सुटी फुले, मसाला पिके लागवड- हळद लागवड, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन यांत्रिकीकरण- ट्रॅक्टर संरक्षित शेती- हरितगृह, प्लास्टीक मल्चिंग, कांदाचाळ, मधुमक्षिका पालन- मधुमक्षिका वसाहत संच वाटप, काढणीपश्चात व्यवस्थापन- पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, पूर्वशितकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतसाखळी, शीतवहन, रायपनिंग चेंबर इत्यादी घटकांकरिता अनुदान देय आहे.

कुठे कराल अर्ज

शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन संकेत- स्थळावर जाऊन अर्ज करावेत. ऑनलाईन लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतरच प्राप्त लक्षांकाच्या मर्यादत तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत पूर्वसंमती देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांनी कळविले आहे.

फलोत्पादन पिकाचा संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूह पद्धतीने सर्वांगिण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे ( SC and ST farmers, apply and avail the benefits of the scheme )

आर्थिक राहणीमान उंचावणे, पारंपरिक उत्पादन पद्धतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे इत्यादी या योजनेचे उद्दिष्ट आहे. (SC and ST farmers, apply and avail the benefits of the scheme )

ऑनलाईन अर्ज  साठी येथे क्लिक करा.

SCaand ST farmers, apply and avail the benefits of the scheme 2024
SC and ST farmers, apply and avail the benefits of the scheme 2024

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !