Shirpur : कोडीद येथे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्याचे समुदेशन व किशोर अवस्थेत होणाऱ्या बदलाविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न.!
Shirpur Kodid : विध्यार्थाना मानसिक आरोग्याचे समुदेशन मार्गदर्शन शिबिर संपन्न. |
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे आज दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन व समुदेशन करण्यात आले. तसेच किशोरावस्थेत होणाऱ्या बदलाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
ह्यावेळी मार्गदर्शक म्हणून मानसिक आरोग्य पथक प्रमुख डॉ.जगदीश झिरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, आर.के.एस.के.समन्वयक नरेश बोरसे हे लाभले व योगेश पाटील, सुनिल पावरा, सागर घोडेस्वार ह्यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.
हेही वाचण्यासारखे : कोडीद येथे मानव विकास मिशन अंतर्गत कार्यक्रम तपासणी शिबिर संपन्न लिंक.
ह्यावेळी मानसिक आरोग्य पथक ह्यांनी शाळेतील विद्यार्थी विध्यार्थीनींना किशोरावस्थेत होणाऱ्या बदलाविषयी तसेच मानसिक आरोग्याविषयी सखोल माहिती व मार्गदर्शन केले. तसेच सदर आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, व्यवस्थापक, स्री अधिक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कार्यालयीन कर्मचारी व सर्व स्टाफ यांना मानसिक आरोग्याविषयी सखोल माहिती सांगण्यात आली.
ह्यावेळी शाळेतील समुपदेशनासाठी कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य केले ह्यावेळी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीदचे मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील, व्यवस्थापक अमित शाह व सर्व स्टाफ शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अर्थेचे मुख्याध्यापिका सविता सोनवणे व व्यवस्थापक व स्टाफ व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
हेही वाचण्यासारखे : शासकीय आश्रम शाळा कोडीद येथे शालेय विद्यार्थ्यांचे विशेष आरोग्य तपासणी लिंक.
ह्यावेळी दोन्ही शाळेतर्फे व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद तर्फे सर्वांचे आभार मानले.