आदिवासी बचाव अभियानाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भक्कम साथ देणारा नायक होता. The true leader of the tribals has been lost! सरपंच ते खासदार पर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय असाच होता. त्यांचे एक वाक्ये कायम स्मरणात राहील. ते आम्हाला म्हणायचे, “ जो येईल त्याच्यासह आणि जो येणार नाही त्यांच्याशिवाय काम ( मुव्हमेंट ) चालू ठेवा. ”
साहेबांकडे दिल्लीत खूपदा जाण्याचा योग आला. मग आदिवासी संदर्भात सुप्रिम कोर्ट केस असेल किंवा इतर आदिवासी संदर्भात सेमिनार असतील अशासाठी त्यांच्याकडे हक्काने रहात असू.
“बोगस हटाव, आदिवासी बचाव” या घोषणेला सुरवात करणारे नेता.
“बोगस हटाव, आदिवासी बचाव” या घोषणेला व कामाला पूर्ण सहकार्य केले. जेथे जेथे जागृती लोकमेळावे असतील त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट न बघता तेथे हजर असत. एकदा धनगर आरक्षणाला सहकार्य करू असे वर्तमान पत्रात त्यांचे वक्तव्य आले त्यावेळी त्यांच्या निवासस्थानावर देखील ढोल बजाव मोर्चा काढला होता. त्यावेळी ते म्हटले की असे जागृत रहा आम्हाला देखील सोडू नका.
२०१२ ला महाराष्ट्र शासनाच्या वतीने पहिला ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस दादासाहेब गायकवाड हॉल नाशिक येथे घेण्यात आला. त्यावेळी प्रशासनाने आमचा नियोजित कार्यक्रम आमच्याकडून काढून घेतला आणि आम्हाला भद्रकाली पोलिस स्टेशनला ठेवले की यांनी कार्यक्रमात व्यत्यय नको आणायला म्हणून.
त्यावेळी भर सभागृहात त्यांनी ४-४ मंत्री उपमुख्यमंत्री अजीत दादा पवार साहेब यांना सांगितले की ज्या संघटनेने हे काम केलेले आहे,त्यांना येथे सुद्धा येऊ दिले नाही हे प्रशासनाचे दुर्दैव आहे. ज्यांनी समाज जागृत केला त्या बांधवांनी हा हॉल देखील बुक केलेला आहे. त्यांना येथे एंट्री नाही ? असे सडेतोड बोलणारे साहेब होते.
आदिवासींचा खरा नेता हरपला! The true leader of the tribals has been lost ! अधिक माहिती वाचा :
त्यावेळी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस व धरती आबा बिरसा मुंडा यांच्या माहितीचे पूर्ण टिपण ते आमच्याकडून घेत असत. आणि अनेकदा संसदेत सुटी जाहिर करण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे,आवाज उठवला आहे.
आज त्यांच्या जाण्याने आदिवासी समूहात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक सामाजिक विचारसरणीचा नेता आपल्यात राहिला नाही. ही मोठी सामाजिक व राजकीय हानी आहे. त्यांच्या सामाजिक गुणाचे अनेक पैलू आहेत. ते त्यांच्या कार्याने अजरामर झाले आहेत.
प्रकृति निसर्गवासी खासदार हरिशचंद्र चव्हाण साहेब यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो. अंतिम जोहार. ! शोकाकुल : आदिवासी बचाव अभियान The true leader of the tribals has been lost!
⇓ हेही वाचाच :
-
काय आहे? आदिवासी अधिकार दिवस संपूर्ण माहिती वाचा.
-
Adv. Prakash Ambedkar आदिवासींच्या बजेटचा पैसा लाडक्या बहिणीला वळवला का?अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल; योजनेसाठी पैसा आला कुठून?
-
उत्तर महाराष्ट्रातील एक आदिवासी पावरा (जात) समाज Adivasi Pawara Samaj
-
आदिवासी क्रांतिकारक जीवा वसावा का जीवन परिचय जाने
-
आदिवासी राजनीति / नेता राजकुमार रोत का जीवन परिचय पढे
- The true leader of the tribals has been lost!