They betrayed him, kicked him and pushed him into the well. : सोबत नेत विश्वासघात केला, लाथ मारून विहिरीत ढकलले पोहता येत असल्याने जीव वाचला, २४ तासांनंतर बाहेर निघाला.
धुळे : शेतातील विहिरीत पाणी बघण्याचा बहाणा करून शेतकऱ्याला सोबत नेले. पाणी बघत असताना लाथ मारून विहिरीत ढकलून जीव घेण्याचा प्रयत्न केला; पण पोहता येत असल्याने शालिग्राम भीमराव पाटील (रा.लोणखेडी, ता. धुळे) या त्याचा जीव वाचला. विहिरीतच २४ तास संघर्ष केला. मुलांसह नातेवाईक शोधत आल्याने शेतकऱ्याला विहिरी बाहेर काढण्यात आले. ही धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील लोणखेडी शिवारात रविवारी दुपारी घडली.
यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते शेतातून घरी जात होते. तेव्हा गावातीलच विजय रामकृष्ण पाटील या शेतकऱ्याचा मोटार सुरू होत नाही. आपण शेतात जाऊन येऊ, असे सांगितले. त्यावर होकार देत दोघेही शेतात गेले.
लाइट नसल्याने विजय शालिग्रम यांना अशोक पंडित वाणी यांच्या शेतात घेऊन गेला. विहिरीतील पाणी बघण्याच्या बहाण्याने विहिरीजवळ नेले. तेथे विजय याने अचानक शालिग्राम यांच्या पाठीमागून जोराची लाथ मारली. ते विहिरीत जाऊन कोसळले. त्यानंतर विजय पाटील हा तेथून निघून गेला.
सोबत नेत विश्वासघात केला, लाथ मारून विहिरीत ढकलले : They betrayed him, kicked him and pushed him into the well
पोहता येत असल्याने त्यांनी विहिरीचा कोपरा धरून आरडा ओरड सुरू केली. मात्र, त्यांना वाचविण्यासाठी कोणीच आले नाही. त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नव्हते.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शालिग्राम यांचा मुलगा व ग्रामस्थ शोध घेत अशोक वाणी यांच्या शेतात आले. तेव्हा त्यांना शालिग्राम पाटील हे शेतातील विहिरीत दिसून आले.
त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शालिग्राम पाटील यांनी धुळे तालुका पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली.
त्यावरून विजय पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बोरसे करत सुदैवाने शालिग्राम पाटील यांना आहेत.
हेही वाचा :
;गेमिंग झोन बनला ;डेथ झोन९९ रुपयांत मुलांचा घात Gaming Zone Became Death झोन
बापाला संपविण्यासाठी पोटच्या मुलाने स्क्रू ड्रायव्हरने केली हत्या
Leave a Reply