Gramin Batmya

weather today Live

आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरती साठी : Tribal 17 Cadre PESA Recruitment Beeg Breaking News Nashik
News

आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरती साठी : आदिवासी सांगठनांचा रास्ता रोको आंदोलन करण्याचीही तयारी

आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरती साठी : Tribal 17 Cadre PESA Recruitment Beeg Breaking News Nashik

Tribal 17 Cadre PESA Recruitment : अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गाची कायम स्वरूपी पदभरती तात्काळ सुरू करा या मागणीसाठी आदिवासी १७ संवर्ग पेसा पदभरती कृती समिती महाराष्ट्र राज्य तर्फे नाशिक येथे गेल्या ११ दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे.आदिवासी पात्रधारक उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडत आहे,आपल्या जीवाची पर्वा न करता उपोषण कर्त्यांचा संघर्ष सुरू आहे.नाईलाजाने आदिवासी उमेदवार अत्यंत टोकाची भूमिका घेत आहेत. तरीही शिंदे- फडणवीस-अजित – तीन चाकी सरकार आदिवासी उमेदवारांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून

दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गोल्फ क्लब मैदान नाशिक पासून आदिवासी विकास भवन नाशिक पर्यंत आदिवासी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या आक्रोश मोर्चात आमची बिरसा फायटर्स संघटना पूर्ण ताकदीनिशी उतरत आहे. वेळ पडली तर रास्ता रोको करण्याचीही तयारी आहे.

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आदिवासी समाजाने मोठ्या उत्साहात नाचत गाजत साजरा केला. आता आपल्या आदिवासी आरक्षणासाठी, आपले हक्क व अधिकारांच्या रक्षणासाठी समाजाने रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही,या जन आक्रोश मोर्चास मोठ्या प्रमाणात सहभागी होवूया.

Tribal 17 Cadre PESA Recruitment : चलो नाशिक, चलो नाशिक, चलो नाशिक आम्ही येतोय, तुम्हीही या! ही वेळ घरी बसून पाठिंबा देण्याची नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ऊलगुलान करण्याची आहे. दिनांक : १२ ऑगस्ट २०२४ ठिकाण : गोल्फ क्लब मैदान नाशिक

ज्यापद्धतीने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी लाखोंची गर्दी केली,एकता दाखवली,तशीच गर्दी तशीच एकजूट ,आदिवासी उमेदवारांच्या पेसा भरतीच्या या लढाईत दाखवूया.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील पेसा १७ संवर्गाची आदिवासी उमेदवारांच्या पदभरतीला मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाला पुढे करत महाराष्ट्र शासनाने स्थगिती दिलेली आहे.परंतु त्या आदेशात पेसा क्षेत्रातील पदभरती करू नये,असे नमूद करण्यात आलेले नाही.

तरीही शासनाने पेसा क्षेत्रात आदिवासी उमेदवारांची पदभरती प्रक्रिया बंद केलेली आहे.या क्षेत्रात फक्त बिगर आदिवासी उमेदवारांची पदभरती प्रक्रिया सुरू आहे.त्यामुळे आदिवासी उमेदवारांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बिगर आदिवासी उमेदवारांची भरती करून त्यांना न्याय व आदिवासी उमेदवारांची भरती थांबवून त्यांच्यावर अन्याय सरकार करीत आहे.पालघर जिल्ह्य़ातील बिगर आदिवासी याचिका कर्त्यांनी मा.उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे.

त्यानूसार विद्यार्थांच्या भरती प्रक्रियेतील निकालानंतरही नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाहीत. लाखों सुशिक्षित उमेदवार बेरोजगार झालेले आहेत. हजारों उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे.त्यामुळे आदिवासी बांधवांत सर्वत्र नाराजी निर्माण झालेली आहे.बिगर आदिवासींची भरती प्रक्रिया सुरू व आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया बंद असल्यामुळे आदिवासी उमेदवारांवर शासन दुजाभाव करत फार मोठा अन्याय करीत आहे.

म्हणून अनुसूचित क्षेत्रातील पेसा १७ संवर्गाची कायम स्वरूपी पदभरती तात्काळ करण्यात यावी.या मागणीसाठी आदिवासी १७ संवर्ग पेसा पदभरती कृती समिती महाराष्ट्र यांच्याकडून दिनांक १ ऑगस्ट २०२४ पासून गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.त्या उपोषणास आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून सक्रिय पाठिंबा दिलेला आहेस.

Tribal 17 Cadre PESA Recruitment : बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. बिरसा फायटर्स संघटनेकडूनसुद्धा पेसा क्षेत्रातील पदभरतीसाठी शासनास वारंवार निवेदन देण्यात आलेली आहेत.तसेच पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आलेली आहेत.

तरी शासनाकडून या पदभरतीला जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.ही एक आदिवासी उमेदवारांवर अन्याय करणारी गंभीर बाब आहे.तरी अनुसूचित क्षेत्रातील पेसा १७ संवर्गाची कायम स्वरूपी पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी. या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

Tribal 17 Cadre PESA Recruitment : आम्ही प्रत्यक्ष नाशिक ला जाऊन मोर्चात सहभागी होतोय, आदिवासी उमेदवारांच्या या संघर्षांच्या लढाईत खारीचा वाटा उचलोय. आम्ही येतोय, तुम्हीही या.

*एकता मिट्टी ने की तो इंट बनी*

*इंट ने एकता की तो दिवार बनी*

*दिवार ने एकता की तो घर बना*

*ये सब बेजान चीजें है फिरभी*

*ये जब एक हो सकते है.

*हम तो इन्सान है, आदिवासी है,इस देश के मालिक है,आरक्षण के हकदार है, अपने हक और अधिकार के लिए एक हो जावो!*

अभी नही तो कभी नही बिरसा पुकारे, ऊलगुलान ,ऊलगुलानय जय बिरसा ,जय आदिवासी!

हेही वाचा :

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !