Ulgulan Book : लक्कडकोट (आंबागव्हाण) ता. तळोदा येथे उलगुलान’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या गावी शिरपूर ची बिरसा फायटर्स टीम सह या सोहळ्यात वक्त्यांनी प्रेरणादायी विचार मांडले. ( उलगुलान’ पुस्तक हवे असल्यास खालील पूर्ण माहिती वाचा.)
उलगुलान’ पुस्तक प्रकाशन सोहळा |
बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव मा. राजेंद्रजी पाडवी सर यांचे प्रेरणादायी ‘उलगुलान’ पुस्तकाचे प्रकाशन आज जेष्ठ साहित्यिक मा. वाहरूदादा सोनवणे यांच्या हस्ते लक्कडकोट (आंबागव्हाण) ता. तळोदा येथे करण्यात आले. यावेळी बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष मा. सुशिलकुमार पावरा, युवा कवी संतोष पावरा, बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष मनोज पावरा शिरपूर टीमकडूव शिवाजी पावरा, विकास पावरा, चुनिलाल पावरा व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान वक्त्यांनी प्रेरणादायी विचार मांडले….. निसर्गरम्य वातावरणात जबरदस्त ऊत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.
हेही वाचा : वनदावे मंजूरीसाठी बिरसा फायटर्सचे ठिय्या आंदोलन
उलगुलान चा अर्थ :
याचा अर्थ असा आहे कि – महान क्रांती किंवा महान बंड, आदिवासी महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्याला हे नाव दिले होते. ‘उलगुलान’ म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील मैलाचा दगड मानला जातो. ही ‘उलगुलान’ चळवळ इस 1895 ते इस 1900 पर्यंत चालली.
‘उलगुलान’ पुस्तक PDF
तुम्हाला जर का उलगुलान’ पुस्तक हवे असल्यास आमच्या Telegram Group वर उपलब्ध आहे ,आताच जॉईन व्हा आणि आम्ही आदिवासींचा इतिहास काय आहे, आदिवासी क्रांतीकार यांचा इतिहास कसा होता हे देखील शेअर करत असतो. Telegram Link
Leave a Reply