World Right to Information Day is celebrated with great enthusiasm on 28 September 2024 : कायद्यात राहणार तर फायद्यात राहणार माहिती अधिकारचे गाढे अभ्यासक श्री. गणेश शिंदे यांचे प्रतिपादन
पिंपळनेर – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष मा.श्री.सुभाषजी बसवेकर साहेब व अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे राज्य समन्वयक मा. श्री. कांतीलालजी जैन सो.यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर व साथ क्रांतिवीर फाउंडेशन साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने कर्म.आ.मा. पाटील विद्यालयात दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त नायब तहसीलदार मा. श्री. पंढरीनाथ रंगनाथ कन्नोर सो. हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून यशदा पुणे चे प्रविण प्रशिक्षक मा. श्री. गणेश अशोक शिंदे साहेब, पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय मा. श्री. विजय चौरे साहेब, कर्म.आ.मा.पाटील विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. पी एच पाटील सर, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मालेगाव शहर अध्यक्ष मा. श्री. पंकज पाटील सो.व साथ क्रांतिवीर फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. निलेश तोरवणे साहेब इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेरचे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ साक्री तालुका चे कार्याध्यक्ष श्री. प्रविण शंकरराव थोरात यांनी केले. याप्रसंगी मा. श्री. गणेश शिंदे साहेब यांनी व्यासपीठावरून उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, *कायद्यात राहणार तर फायद्यात राहणार* माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
मा.श्री. निलेश तोरवणे सो.व मा.श्री.पी एच पाटील सो.यांनी देखील सुंदर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मा.श्री. पंढरीनाथ रंगनाथ कन्नोर साहेब यांनी जमीन महसूल या विषयावर उपस्थितांना खूपच छान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मा. श्री. अनिल महाले सर यांनी केले.
तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाची मदत मा.श्री. प्रविण थोरात, श्री. हंसराजजी शिंदे, श्री. रावसाहेब शिंदे,श्री. भरत बागुल, श्री. चंद्रकांत अहिराव, श्री. अनिल महाले,श्रीमती. भिमाबाई चौरे, श्री. प्रमोद जोशी, श्री. सोमनाथ बागुल ,श्री. अरुण गांगुर्डे, श्री. धनंजय देवरे, श्री. पराग महाजन, श्री.मुकुंद खैरनार यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी श्री अजय सूर्यवंशी,श्री. नारायण गांगुर्डे, श्री. उमेश गांगुर्डे, श्री. राजेंद्र एखंडे ,श्री देविदास बर्डे, श्री.धनंजय बर्डे सर ,श्री. निलेश मानकर सर व इयत्ता अकरावीचे व बारावी कला व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
हेही वाचा :