नमस्कार मित्रांनो रोजगार हमी योजने अंतर्गत आता गावातच मिळेल हाताला काम; नोंदणी केली का? नसेल केली तर आजच आपल्या ग्रामपंचायत च्या रोजगार सेवक यांच्याशी संपर्क करा. आणि रोजगार उपलब्ध करून संधी घ्या. हि News आहे मावळ तालुक्यातील.
गावातच मिळेल हाताला काम; नोंदणी केली का? वाचा संपूर्ण माहिती |
ग्रामीण बातम्या : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, या योजनेंतर्गत काम मागणाऱ्या लाभाध्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो, यामध्ये २०० दिवसांपर्यंत रोजगाराची हमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते.
संबंधित लेख : ग्राम रोजगार सेवक ची संपूर्ण माहिती मराठीत Link
घरकुल, रस्ते, गोठा, फळबागा यांच्यासह विविध कामांच्या पूर्ततेसाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामकाज फेले जाते. यासाठी गाय पातळीवर जॉब कार्डधारक मजुरांना प्राधान्याने बोलविले जाते, परंतु मावळ तालुक्यात झालेले शहरीकरण, तसेच रोजगाराच्या उपलब्ध संधी, यामुळे जॉब कार्ड काढण्याकडे व जॉब कार्डधारक असलेले मजूर या कामांकडे पाठ फिरवितानाचे चित्र सध्या दिसत आहे.
कामासाठी नोंदणी कोठे, कशी कराल?
जॉब कार्डधारक मजुराने कामासाठी नोंदणी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक किवा ग्रामरोजगार सेवक यांच्याकडे करावी, यासाठी जाँब कार्डची माहिती व काम मागणीचा अर्ज नमुना ४ भरून द्यायचा असून, काम मागणी केल्यानंतर १५ दिवसांत काम दिले जाते,
काम न दिल्यास मिळतो बेरोजगार भत्ता.
जर १५ दिवसांत काम दिले गेले नाही, तर बेरोजगार भत्ता देण्यात येती, तालुक्यात ९५ ग्रामपंचायतींत कामे तालुक्यातील २०३ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू असून, ५ ग्रामपंचायतीमध्ये एकही काम सुरू नाही, या कामांमध्ये शोषखड्डे, विहीर, तसेच फळबाग योजनेचा समावेश आहे. गावपातळीवरील जाँच कार्डधारक मजुरांना बोलविले जाते.
मावळ तालुक्यात मागणी केल्याप्रमाणे सर्वांना कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सध्या शेतातील कामे चालू असल्याने मागणी मंदावली आहे. शेतातील कामे झाल्यानंतर सर्व गावांत कामे चालू होतील. – सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, मावळ, मावळ तालुक्यात १५,८८२ जॉब कार्डधारक मावळ तालुक्यात सध्या १५,८८२ जॉब कार्डधारक असून, ३२.१४३ मजुरांची नोंद आहे. चालू उपांत ४५९ मजुरांनी कामाची मागणी केली. त्या सर्वांना कामाची उपलब्धता करून देण्यात आली.
मागेल त्याला मिळेल काम
रोजगार हमी योजनेचे ‘मागेल त्याला काम वासोबतच गुणवत्तापूर्ण टिकाऊ उत्पादक मत्ता निर्माण करणे, गरिचांच्या उपजीविकेचे साधनांचा आधार मजबूत करणे हा महत्वाचा उद्देश आहे. यामध्ये उपलब्ध असलेल्या वैयक्तिक योजना उदा. विहीर, विहीर पुनर्भरण, गाय गोता, रेशीम शेती, बांबू लागवड, फळबाग, कुक्कुटपालन या योजनांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनीनी घ्यावा, असे से रोजागार हमीचे उपजिल्हाधिकारी दीप्ती सुर्यवंशी यांनी सांगितले.
Leave a Reply