जनकल्याणाच्या योजनांचा आता थेट फायदा. लाभार्थ्यांना मिळणार

जनकल्याणाच्या योजनांचा आता लाभार्थ्यांना मिळणार थेट फायदा.

ग्रामीण बातम्या : प्रत्येक जिल्ह्यातून किमान हजार लाभार्थ्यांना ७५ जनकल्याणाच्या विविध योजनांचा थेट लाभ देणारे जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची’ हे अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे. १५ एप्रिलपासून सुरू होऊन १५ जूनपर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर २७ लाख लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकाच छताखाली येऊन लाभार्थ्यांना मदत करणार आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

राज्य सरकारच्या वतीने जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात येतात. मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे,

  • शासकीय योजनांची जत्रा अभियानाला सुरुवात 
  • उपक्रम यशस्वी करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून निर्देश
  • विविध यंत्रणांसाठी कार्यपद्धती.

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेऊन या उपक्रमांतर्गत राबवावयाच्या योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरविण्यात येईल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट सूचना दिल्या जातील. 

अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घेतले जाणार आहे. या अभियानाच्या आयोजनासाठी निधी उपलब्धतेबाबतही शासन निर्णयात तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयस्तर ते तालुकास्तर व विविध यंत्रणांसाठी कार्यपद्धतीही निर्धारित करण्यात आली आहे.

जनकल्याणाच्या योजनांचा आता लाभार्थ्यांना मिळणार थेट फायदा.

आवश्यक दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, हे कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते. दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते. यावर पर्याय म्हणून चाळीसगाव, जामनेर, मुरबाड, कल्याण इत्यादी ठिकाणी.

“जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची’ नावाचा अभिनव व पथदर्शी उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यात आला आहे.

आता या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहेत. या अभियानाचे समन्वयन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे.
हेही वाचा 👇🏻👇🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !