वैरण विकास योजना १०० टक्के अनुदान आजच या योजनेचा लाभ घ्या.

वैरण विकास योजना : शेतकरी बांधवांनो शासन देत आहे. चारा पिकवा, आणि पैसा कमवा योजना; ती म्हणजे वैरण विकास योजना. वैरण विकास योजनेच्या ०० टक्के अनुदानात अंमलबजावणीचा होणार फायदाच फायदा. चला तर मग जनुया सविस्तर माहिती.

वैरण विकास योजना म्हणजे काय?

हि योजना शेतकरी बनवांसाठी आहे, जनावरांच्या वैरणीचा भाव गगनाला टेकत आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्यावतीने चारा टंचाई लक्षात घेऊन वैरण विकास योजना  चालवून विशेष म्हणजे या योजनेत १०० टक्के अनुदान आहे, याचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे म्हणून योजना चालू केले आहे.

वैरण विकास योजना विशेष माहिती 

यंदा पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी झाला. त्यामुळे जनावरांच्या वैरणीचा भाव गगनाला टेकत आहे.  जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्यावतीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून वैरण विकास अनुदान योजना अंमलात आणली, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८ हजार ६१० शेतकऱ्यांना प्रत्येकी सात किलो चारा बियाणे देण्यात आले. सुमारे 1500 रुपये किमतीचे हे अनुदानित बियाणे अर्जदार शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

वैरण विकास योजना संबंधित माहिती

  • कोणाबाद्द्ल लेख आहे .        वैरण विकास योजना
  • कोणी लांच केले ? .               महाराष्ट्र सरकारने
  • लाभार्थी .                             महाराष्ट्र राज्याचे शेतकरी
  • साल                                     2023
  • उद्देश्य                                 वैरण विकास योजनाची महत्वपूर्ण माहिती देणे.
  • अधिकृत वेबसाइट               लिंक

संबंधित लेख : विहीर अनुदान योजना 

जिल्ह्यात वैरणीला प्रति टन ६ हजार रुपयांपर्यंत भाव

• जिल्ह्यात चाऱ्याची भीषण टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही लोकांनी चात्याचे भाव वाढविल्याचे दिसून आले आहे.

आज जिल्ह्यामध्ये सुमारे ६ रुपये प्रति टन सोयाबीनचे भूस विक्री होत आहे. मकाचा मुरघास प्रती टन तीन हजार रुपये आणि अन्य हिरव्या चाऱ्यालाही चांगलेच दर मिळत आहे.

  • जनावरे सांभाळणे परवडेना
  • कमी पावसामुळे वैरण महागली

जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे नदीनाल्याला पूर आलाच नाही. परिणामी भूजल पातळी कमालीची घटत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरी चारा पिकवण्याची शक्यता कमी आहे. यामुळेच आतापासूनच वैरण महागले असल्याची चर्चा आहे.

वैरण पिकविण्यासाठी १०० टक्के अनुदानित बियाणे

जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून वैरण विकास अनुदान योजना अमलात आणली, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८ हजार ६१० शेतकऱ्यांना प्रत्येकी सात किलो चारा बियाणे देण्यात आले.

  • जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाई
  • आमच्याकडे ११ गायी आहेत. शशिकांत जाधव, शेतकरी, वारेगाव,

एका गायीला प्रतिदिन ५० ते ६० किलो चाऱ्याची आवश्यकता असते. सध्या दुधाचे रेट खूपच घसरल्याने जनावरे सांभाळणे परवडत नाही. आम्ही मुरघास अडीच हजार रुपये प्रती टन दराने महिनाभरापूर्वी खरेदी केला होता आता हा दर ३००० पर्यंत जाईल. यामुळे उन्हाळ्यात जनावरे कशी सांभाळावी, असा प्रश्न आहे.



तालका फलंबी

अत्यल्प पावसामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची भीषण टंचाई जाणवत आहे. शेतकरी आता जनावरासाठी विदर्भातून सोयाबीनचे भूस विकत आणत आहे. यासाठी प्रती कंटेनर सुमारे २५ ते २६ हजार रुपये खर्च करावा लागतो.

गणेश बरकुल, शेतकरी, टाकली माली

लक्षात घेऊन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने वैरण विकासासाठी शासनाकडे ऑगस्टमध्ये प्रस्ताव पाठविला होता. राज्यात शासनाकडून १ कोटी ७९ लाख रुपये वैरण विकास अनुदान मिळविणारा आपला पहिला जिल्हा ठरला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८ हजार ६१० शेतकऱ्यांना प्रत्येकी सात किलो चारा बियाणे देण्यात आले. सुमारे १५०० रुपये किमतीचे हे अनुदानित बियाणे अर्जदार शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.




वैरण विकास योजनेसाठी अर्ज कसा करावा. 

अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन वैरण विकास योजनेचा online भरून घ्या. विशेष करून राज्याच्या काही जिल्ह्यात अर्ज भरणे चालू आहे. लिंक आम्ही देत आहोत. लिंक न चालू झाल्यास कॅमेंट करा.



वैरण विकास योजनेसाठी लागणारे कागदपत्रे.

  • १) आधार कार्ड .
  • २) मतदान कार्ड .
  • ३) रहिवासी दाखला.
  • ४) राशन कार्ड .
  • ५) उत्पनाचा दाखला.
  • ६) पासपोर्ट फोटो.
  • ७) शाळा सोडल्याचा दाखला.
  • ८) लाभ न घेतल्याचा स्वयंघोषणा पत्र.
  • ९) जॉब कार्ड.
  • १०) अनुसूचित जाती / जमाती असल्यास ( जातीचा दाखला )
थोडक्यात 
आमचा लेख आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. आम्ही तुमच्या साठी अशाच प्रकारचे नवनवीन शासकीय योजनेचे माहिती प्रसारित करून देऊ , तरी आम्ह्या सोसीअल मेडिया ला जॉईन व्हा . Facebook लिंक आणि Telegram लिंक देत आहोत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !