अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

धुळे :  न्युक्लीअस बजेट योजनेतंर्गत सन  ०२२-२३ या आर्थिक वर्षात लाभ घेणेकरीता अनुसूचित जमातीच्या ( आदिवासी) लाभार्थ्याकरीता प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळेमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रक्लप कार्यालयाच्या अधिनस्त असलेले धुळे, शिंदखेडा, साक्री व शिरपुर या तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्याना (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयाकडून १६ ते २५ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत योजनेचे अर्ज वाटप करण्यात येतीली.

पात्र लाभार्थ्यांनी २८ ते ३० नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत परिपूर्ण अर्ज भरुन कार्यालयात जमा करावे. विहित कालावधीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर योजना राबविण्यात येईल. 

गट-अ-

1) अनुसूचित मातीच्या ८ बचतगटांना पापड बनविण्याचे यंत्र खरेदीकरीता ८५ टक्के अर्थसहाय्य देणे.

2) २० आदिवासी ग्रामपंचायतींना सार्वजनिक, कार्यक्रमासाठी भांडी संच ८५ टक्के अनुदानावर पुरवठा करणे,

3) अनुसूचित जमातीच्या ३० लाभार्थ्यांना झेरॉक्स मशिन खरेदी करीता ८५ टक्के अर्थसहाय्य देणे,

गट-

1)  अनुसूचित जमातीच्या ४० युवक-युवतींना कौशल्यावर आधारित सोलर (पीव्ही) जुळणी व दुरुस्तीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणे,

2) अनुसूचित जमातीच्या ४० युवकांना चारचाकी व दुचाकी दुरुस्तीचे प्रशिक्षण देणे,

3) अनुसूचित जमातीच्या ४० युवकांना वेल्डींग कामाचे प्रशिक्षण देणे,

4) अनुसूचित जमातीच्या ४० युवक-युवतींना हलके चारचाकी वाहन ड्रायव्हिंग प्रशिक्षण देवून लायसन्स काढून देणे.


या योजनांसाठी लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे. या योजनांसाठी अटी/शर्ती –

अनु. क्र.१ मधील योजनेकरीता बचत गटाकरिता अर्ज मागणीसाठी बचतगटाने बचतगट नोंदणी प्रमाणपत्राची छायांकीत प्रत सोबत आणावी.

अनु. क्र.२ मधील योजनेकरीता सरपंच/ग्रामसेवकाने ग्रामपंचायत ठराव सोबत आणावा. अनु. क्र. ३ ते ७ मधील योजनेकरीता यत्ता १२ वी उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे. 

योजनानिहाय आवश्यक कागदपत्रांची माहिती अर्जासोबत नमुद करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !