आदिवासी अधिकार दिवस मोठ्या दिमाखात व मोठ्या उत्साहात साजरा.!

बोराडी येथे शिरपूर तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन आदिवासी अधिकार दिवस मोठ्या दिमाखात व मोठ्या उत्साहात साजरा.!

आदिवासी अधिकार दिवस मोठ्या दिमाखात व मोठ्या उत्साहात साजरा.!

दिनांक १६ सप्टेंबर रोजी सातपुड्याच्या कुशीतील शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे अनेक राज्यातील आदिवासींचे बुलंद आवाज असणारे वक्ते व प्रमुख पाहुणे ह्यांच्या उपस्थितीत धुळे, नंदुरबार इतर रज्यातील व जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधव एकत्र येऊन आदिवासी अधिकार दिवस मोठ्या उत्साहात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.

१३ सप्टेंबर २०१४ रोजी आदिवासी लोकांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेने एक ठराव मंजूर केला. त्यात जागतिक आदिवासी लोकांच्या संरक्षणासाठी घोषणापत्र तयार केले. जाहीरनाम्यातील आदिवासींचे अस्तित्व, कल्याण आणि विकासाचे सातत्य लक्षात घेऊन आपल्या देशात आदिवासींचे काय हक्क आहेत याबाबतीत बरेचशे अज्ञान असल्याने आदिवासी बहुसंख्य भागातील सर्व संघटना एकत्र येऊन आदिवासी कला, संस्कुती, ज्ञान, नैसर्गिक वारसा, इतिहास, जीवनशैली, जीवनमूल्ये, साधेपणा, सहकार, सहिष्णूता, बंधुता, स्वावलंबन, स्वाभिमान, निसर्ग संवर्धन, प्राणी संरक्षण इत्यादी जगाला खऱ्या अर्थाने सांस्कृतिक मूल्यांची गरज आहे.

यंदा अठरावा आंतरराष्ट्रिय आदिवासी अधिकार दिवस आहे. आदिवासींचे अधिकार हक्कांबाबत लोकांमध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात आला.

ह्यासाठीच शिरपूर तालुक्यात प्रथम आदिवासी समाज व समाज संघटना मिळून आदिवासी अधिकार दिवस १६ सप्टेंबर रोजी बोराडी येथे सर्व आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत “आदिवासी अधिकार दिवस” मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.

हेही वाचा : काय आहे? आदिवासी अधिकार दिवस

ह्या कार्यक्रमासाठी शिरपूर तालुक्यातील सर्व समाज बांधव सर्व आदिवासी संघटना सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग सर्व ह्यांच्या समन्वयाने एकत्र येऊन ह्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

ह्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण कवाट मध्य प्रदेश येथील सामूहिक नृत्य, तोरणमाळ येथील सामूहिक पावा नृत्य, धडगाव येथील मांदल डुल नृत्य होते.

आदिवासी अधिकार दिवस मोठ्या दिमाखात व मोठ्या उत्साहात साजरा.!

ह्यावेळी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आखिल भारतीय आदिवासी पावरा बारेला समाज मंडळाचे अध्यक्ष नामदेव पटले साहेब लाभले.

प्रमुख वक्ते म्हणून वाहरूदादा सोनवणे, सतिषदादा पेंदाम, गोसाजी पेंटर, पोरलालजी खरते, दिनकर पावरा साहेब, सीमाताई वास्कले, प्रभूजी टोकीया, अशोक बागुल सर व अध्यक्षीय भाषण नामदेव पटले साहेब ह्यांचे लाभले.

प्रमुख पाहुणे म्हणून वाहरूदादा सोनवणे, सतिषदादा पेंदाम, गोसाजी पेंटर, पोरलाल खरते, दिनकर पावरा साहेब, जयस नारीशक्ती सीमाताई वास्कले, प्रभू टोकीया, अशोक बागुल, नामदेव पटले साहेब, जेलसिंग पावरा साहेब, सुरेश मोरे साहेब, सत्तरसिंग पावरा, रमेश वसावे, डॉ.जितेंद्र ठाकूर, कमलेश पटेल, दत्तू पाडवी, मनोज पावरा, सुमित्राताई परमार, साधनाबेन मीना, जुली सस्त्या, शमाताई पावरा, प्रमिला पावरा, सुनील सुळे, सीताराम पावरा व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजनाताई पावरा, सूत्रसंचलन दशरथ पावरा व आभार प्रदर्शन डॉ.हिरा पावरा ह्यांनी केले.

ह्या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजक म्हणून देवमोगरा मा ता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विशाल पावरा, दाजीमल पावरा सर, डॉ.हिरा पावरा, संजय खैरनार सर, भरत पावरा व सर्व पदाधिकारी सर्व टीम व शिरपूर तालुक्यातील सर्व आदिवासी समाज संघटना व सर्व समाज एकत्र येऊन ह्या दिवसाचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !