Adivasi Kalyan Yojana : आदिवासी कल्याण योजनांचे १६ हजार कोटी वळवले इतरत्र आदिवासींच्या कल्याणकारी योजनांसाठी गेल्या ७ वर्षांत मंजूर केलेल्या ७०,४७७ कोटींपैकी राज्यसरकारने केवळ ५४,३४९ कोटी रुपये खर्च केले आहेत.
Adivasi Kalyan Yojana : |
Adivasi Kalyan Yojana : उर्वरित १६,१२८ कोटींचा निधी हा इतरत्र वळविल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. याशिवाय आदिवासींना हक्काची घरे मिळण्यासाठी आखलेल्या शबरी आदिवासी घरकुल योजनेकडेही सरकारने दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : बांबू साठी 7 लाख चा अनुदान मिळेल
राज्यात आदिवासींची लोकसंख्या सुमारे १ कोटी ५ लाख १०,२१३ इतकी आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी २०१५ ते २०२२ या ७ वर्षांच्या काळात ७० हजार ४७७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ५४ हजार ३४९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. आदिवासींच्या विकासासाठी तरतूद करण्यात आलेला १६ हजार १२८ कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळविण्यात आला आहे.
आदिवासी घटक योजनेसाठी २०२२-२३ मध्ये १२,५६२ कोटींचा निधी प्रस्तावित होता. मात्र, त्यापैकी फक्त ५ हजार ८३२ कोटी ४५ लाखांचा निधी खर्च झाला असून खर्चाचे हे प्रमाण केवळ ४६.४२% इतके असल्याचे दिसून आले आहे.
शबरी आदिवासी घरकुल योजनेकडे दुर्लक्ष.
■ आदिवासींना हक्काची घरे मिळण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या शबरी आदिवासी घरकुल योजनेत गेल्यावर्षी २४ हजार ७५ घरे बांधण्याचे लक्ष्य सरकारने निर्धारित केले होते. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले असून आतापर्यंत केवळ ९४३ घरांना मंजुरी मिळाल्याची माहिती आदिवासींच्या हक्कासाठी काम करणाऱ्या समर्थन या सामाजिक संस्थेकडून मिळाली.
घरकुल योजना ची यादीसाठी क्लिक करा