धाडणे येथे आर. ओ. प्लांट नावापुरताच प्लांट सुरु करण्यासाठी ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा.
चिकसे : साक्री तालुक्यातील धाडणे येथे १५ व्या वित्त आयोग अंतर्गत शुद्ध पाणी प्रकल्प अर्थात आर. ओ. प्लांट उभारण्यात आला आहे. प्रकल्प उभारला असला तरी तो फक्त नावापुरताच आहे काय ? गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळणार कधी? असा प्रश्न उपस्थित करुन ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. या प्लांटसाठी सन २०२१- २२ मध्ये ९ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, एक ते दीड वर्षापासून प्रकल्प तयार करण्यात आला असला तरी या योजनेचा कोणताही लाभ अद्याप झालेला नाही, असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये ५ रुपयात २० लिटर शुद्ध पाणी योजना सुरू आहे. परंतु धाडणेत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पातून ग्रामस्थांना काहीही लाभ मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी
केला आहे. उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांना आर. ओ. प्लांट मधून थंड पाणी मिळून गारवा निर्माण होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली होती. मात्र, ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे ती फोल ठरताना दिसत आहे. लग्न समारंभ अथवा इतर कार्यक्रमांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी गावकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणावरून पाण्याचे जार मागवावे.लागत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अद्याप सुरू न झालेला हा प्रकल्प त्वरित सुरू करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
धाडणे हे गाव पांझरा नदीकाठी असल्याने पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे असंख्य आजार पसरतात. त्यामुळे गावाचे आरोग्य धोक्यात येते. उपचारासाठी सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे.
नाहक दवाखान्यात खर्च होतो. कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ या सारख्या आजारांचा गावात प्रादुर्भाव होतो. योजनेतून उभारण्यात आलेल्या प्लांट मधून शुद्ध पाणी गावाला मिळाले तर आरोग्याच्या समस्या सुटतील. तरी आर. UNG ओ. प्लांट सुरू करण्यासंबंधी वेळोवेळी ग्रामपंचायतीला विचारणा केली असता दोन दिवसात सुरू करु, लवकर चालू होईल, अशी उड़वा- उडवीची उत्तरे ऐकायला मिळतात. मात्र, पाणी मिळतच नाही. म्हणून ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे तरी ही समस्या न सुटल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा चंदर अहिरराव, विजय अहिरराव, नितीन अहिरराव, सनी अहिरराव, मनीष अहिरराव, पवन अहिरराव यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
Leave a Reply