दोन फूट नऊ इंच अतिक्रमणामुळे गमावले ग्रामपंचायत सदस्यपद.
कुर्डुवाडी : सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले म्हणून माढा गटविकास अधिकारी कुर्डुवाडी, माढा तालुक्यातीलन टाकळी (टें) येथील ग्रामपंचायत जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. केवळ दोन फूट नऊ इंच घरकुल आवास योजनेंतर्गत घरकुल जागेच्या अतिक्रमणामुळे ग्रामपंचायत सदस्यपदाला मुकावे लागले आहे.
सदस्याला याबाबत याचिकाकर्त्या वैशाली कळसाईत व अजित घाडगे यांनी टाकळी येथील ग्रा. पं. सदस्या रूपाली आयवळे यांचे पती सागर आयवळे यांनी ग्रामपंचायतच्या गावठाण हद्दीतील जागेवर अतिक्रमण करून.
हेही वाचा :
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लिंक.
विहीर योजना ऑनलाइन अर्ज लिंक
शेतकरी योजना लिंक
बांधकाम केल्याचे निदर्शनास आणून ग्रामपंचायत टाकळी (टें) आणि यांच्याकडे तक्रार केली होती. ग्रा.पं.च्या सदस्य रूपाली आयवळे यांच्या पतीच्या नावे २०१८-१९ मध्ये रमाई मंजूर झाले होते. हे घरकुल सागर आयवळे यांनी त्यांच्या ग्रामपंचायत मिळकत क्रमांक १३७ मध्ये बांधकाम करून गावठाण हद्दीतील दोन फूट नऊ इंच जागेवर पूर्व-पश्चिम जादा बांधकाम केल्याचे पंचायत समितीचे घरकुल अभियंता (आरएचई) यांना मोजमापे घेऊन अतिक्रमण केल्याचे दिसून आले.
त्यासंदर्भात विस्तार अधिकारी कुर्डुवाडी, गटविकास अधिकारी कुर्डुवाडी, ग्रामसेवक यांनी स्थानिक प्रत्यक्ष चौकशीतून अतिक्रमण केल्याचा अहवाल सादर केला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. त्यानंतर रूपाली आयवळे यांचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात येत आहे, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे माढा तालुक्यातील ग्रामीण भागातील गावोगावच्या सरकारी जागेत अतिक्रमण केलेल्या अनेक ग्रामपंचायत सदस्यांचे धाबे दणाणले आहे.
Telegram
: Link
Facebook
: Link
Leave a Reply