पंतप्रधान आवास योजनेची चौकशी. टेंडर घोटाळा उघडकीस

पंतप्रधान आवास योजनेत टेंडरिंग; बडे मासे अडचणीत !

मनपा उपायुक्तांची तक्रार तीन कंपन्यांच्या १९ भागीदारांवर गुन्हा दाखल; कंत्राटदारांसह मनपातील यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात 

औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून (आयपी अँड्रेस) टेंडर (निविदा) भरण्यात आल्याचे उघडकीस आल्याने महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या १९ मालक- भागीदारांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे निविदा अंतिम करणे, कंत्राटदार निश्चित करण्यात गुंतलेले मनपातील तत्कालीन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ‘महाराष्ट्र’ वर.


असा समोर आला प्रकार

मनपा प्रशासक डॉ. चौधरी यांनी निविदेचा बारकाईने अभ्यास केल्यावर ही निविदा सिगन आयपी अॅड्रेसवरून भरली असल्याचे उघडकीस आले. एकाच लॅपटॉपवरून ही निविदा चारही कंपन्यांनी अपलोड केल्याचे समोर आले.

 ४०,००० घरांसाठी 8,000 कोटींचा प्रकल्प

हा संपूर्ण टेंडर घोटाळा उघडकीस येताच गुरुवारी रात्री मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा ई-निविदेत फसवणूक करणाऱ्या समस्थ कंपनीसह तीन कंपन्यांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल. करण्यात आले असल्याचे मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

आवास योजनेचा आजवरचा प्रवास…..

समस्थ मन्टीविंज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. ४० हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हर्सल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची १२८ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती.

३१ मार्च २०२२ पूर्वी तत्कालीन मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी निविदा अंतिम करून त्यास राज्य सरकारची मंजुरी घेत केंद्राकडे प्रस्ताव दाखल केला.

 *घरकुल यादी पहा मोबाईलवर..लिंक 

 केंद्र सरकाची नवी लिंक..पहा लिंक 

3 केंद्र सरकारच्या समितीने ३० मार्च २२ रोजी घरकुल प्रकल्पाला मान्यता दिली होती; परंतु समरथ कन्स्ट्रक्शनने बँक गॅरंटी भरण्यास असमर्थता दर्शविली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर समरथ कंपनीने पडेगाव येथील घरकुल प्रकल्पासाठी बँक गॅरंटी भरली. चारपैकी एक कंपनी अपात्र ठरली होती.

अक्कलकुवा तालुक्यातील रामपुर घरकुल घोटाळ्याची होणार उच्च स्तरीय चौकशी.

CEO BDO सह ग्रामसेवक व भ्रष्ट काम करणाऱ्यांची होणार चौकशी…


आमदार आमश्या पाडवी यांनी केली कारवाईची मागणी…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !