Gramin Batmya

weather today Live

News

पिंपळनेर – सटाणा रस्त्याचे प्रलंबित काम त्वरित करा. अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी.

Pimpalner Satana Pending road work

पिंपळनेर- शहरातून जाणाऱ्या विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 G चे चौपदरीकरणाचे काम गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित आहे. एकविरा माता कॉर्नर ते सामोडे चौफुली पर्यंतच्या रस्त्यावर खूप खड्डे पडले असून पिंपळनेरच्या नागरिकांना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत, तर दुर्दैवाने एका व्यक्तीला जीव देखील गमवावा लागला आहे. 



यापुढे सदर रस्त्यावर अपघात होऊन जीवित हानी झाल्यास आपणा विरुद्ध तसेच मा.कार्यकारी अभियंता सो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्यादित)- नाशिक, मा. प्रकल्प संचालक सो. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण धुळे, मा. उपविभागीय अधिकारी सो. धुळे विभाग धुळे, मा. जिल्हाधिकारी सो.धुळे व मा. अप्पर तहसीलदार सो.पिंपळनेर यांच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. 



तरी पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 G चे प्रलंबित काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे, अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर यांच्या मार्फत लेखी निवेदन मा. अप्पर तहसीलदार सो. तहसील कार्यालय पिंपळनेर यांच्यामार्फत मा. श्री. एकनाथरावजी शिंदे सो. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई – 32 यांना देण्यात आले.



Related News : 1) सामोडे चौफुली ते कालिका माता मंदिर, या रस्त्याच्या कामाला सुरुवात. Link. 

2) पिंपळनेर गावाची गावठाण व गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करा. Link .

सदर निवेदन पिंपळनेर अप्पर तहसीलचे नायब तहसीलदार मा. श्री.बहिरम साहेब यांनी स्वीकारले या प्रसंगी अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेरचे अध्यक्ष श्री. प्रविण थोरात,व पदाधिकारी श्री.रोहिदास सावळे, श्री.रावसाहेब शिंदे,श्री. भरत बागुल,श्री.दिनेश भालेराव हे ऊपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !