मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे म्हणून राज्य शासन शेतकऱ्यांसाठी ९०% आणि ९५% अनुदानावर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना गेल्या काही वर्षापासून राबवीत आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. ची प्रक्रिया..
१) जोडण्या प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना आपण सोलर पंप जोडणीसाठी इच्छुक आहात का हे विचारून त्यांची नवीन सोलर पंप जोडणी साठी नोंदणी घेतली जात आहे.
२) ज्या शेतकऱ्यांनी विजेच्या जोडणी घेण्यासाठी महावितरणाकडे कोटेशनचा भरणा केलेला आहे. अशा शेतकऱ्यांना महावितरण द्वारे मेसेज देऊन नोंदणी साठी सांगण्यात येत आहे.
३) महावितरणच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन आपण आपली अर्जाची नोंदणी करू शकतात.
Link
४) लिंकवर क्लिक केल्यानंतर नवीन अर्जाची पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला या पेज वरती आपणास ग्राहक क्रमांक एंटर करायचा आहे.
५) ग्राहक क्रमांक एंटर केल्यानंतर नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
६) अर्जामध्ये शेतकऱ्याविषयी माहिती दाखवली जाईल. त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून सोलर पंप घेण्यास इच्छुक आहात का असे विचारले जाईल आणि होय ऑप्शन निवडा.
७) त्यानंतर या ठिकाणी तुमची नोंदणी केली जाईल की तुम्ही सौर पंप घेण्यासाठी इच्छुक आहात. त्यानंतर तुमची सोलर देण्याच्या प्रक्रिया सुरू होईल.