श्री. संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न.
पिंपळनेर (प्रवीण थोरात) येथील श्री. अहिर सुवर्णकार समाज मंडळामार्फत श्री. संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 738 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी पिंपळनेर शहरातून दिंडी व पालखी सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पिंपळनेर शहरातील संपूर्ण सुवर्णकार समाजातील पुरुष व महिला यांनी सहभाग घेतला.
श्री. ह. भ. प. भजनी मंडळ पिंपळनेर सामोडे, शेवडीपाडा, बल्लाणे, पुण्याचापाडा, धंगाईमंडळ, कडेश्वर मंडळ, सुदाम महाराज (पैलाड), माऊली परिवार यांचे अनमोल सहकार्य लाभले.त्यानंतर श्री. दंमडकेश्वर लॉन्स येथे प्रवचनकार ह.भ.प. आचार्य भाऊसाहेब महाराज (वाराणसी) यांचे श्री. संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रवचन रसाळ आणि मधुर वाणीत सादर करण्यात आले. पिंपळनेरच्या संपुर्ण सुवर्णकार समाजाची मोबाईल नंबरसह यादी या प्रसंगी तयार करण्याचे काम देखील करण्यात आले.
त्यात श्री. प्रवीण थोरात व श्री. जगदीश ओझरकर यांनी सहकार्य केले. उपस्थित सर्वांच्या भोजन प्रसादा नंतर धंगाई मंडळ व कडेश्वर मंडळ पिंपळनेर यांच्या भजन संध्याने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला ह.भ.प.श्री.भालचंद्र आबा दुसाने,श्री. प्रकाश अहिराव,श्री. प्रवीण थोरात,श्री. जगदीश ओझरकर,श्री.शाम दुसाणे,श्री. मोतीलाल पोतदार,श्री. मनोज थोरात,श्री.मंदार अहिराव,श्री.पंकजदुसाणे,श्री.मनोज थोरात (भैया)श्री. राजेश चव्हाण,श्री.मनोज चव्हाण,श्री.सुरेंद्र दुसाणे.
श्री. प्रकाश विसपुते,श्री.अजय जडे,श्री. अशोक ओझरकर,श्री. विनोद दुसाणे,श्री.सिद्धू अहिरराव,श्री.प्रफुल दुसाणे,श्री. रत्नाकर चव्हाण,श्री. योगेश दुसाणे,श्री. मोतीलाल दुसाणे,श्री.धनंजय अहिरराव,श्री.किशोर विसपुते,श्री.बलराज अहिरराव,श्री.विनोद अहिरराव, इत्यादी पुरुष मंडळी व पिंपळनेर सुवर्णकार महिला मंडळ,यांचे विशेष सहकार्य लाभले.
Leave a Reply