१४ तारखेला हजारो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय सोमर आंदोलन. सांगवी गावात आदिवासी समाजावर हल्ला करणारयावर तात्काळ गुन्हे दाखल करा यासाठी,,, राजकीय षडयंत्र थांबावा आदिवासी विरोधात,,, भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य, दिपक दशरथ अहिरे.
सांगवी आदिवासी क्रांती कारकारकांचे बॅनर विटंबनाप्रकार शिंदखेडा भिल समाज विकास मंचचे निवेदन.
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील – भिल समाज विकास मंच च्या वतीने जिल्हाधिकारींना निवेदन मार्फत तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे, पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनाच्या माध्यमातून दि. १०-०८- २०२३ रोजी सांगवी ता. शिरपूर जि. धुळे येथे आदिवासी क्रांती कारकारकांचे बॅनर चे विटंबना करणाऱ्यांवर चौकशी करुन गुन्हे दाखल करावा व सांगवी गावातील निर्दोष आदिवासी समाज बांधवांवर राजकीय दबाव तंत्र वापरून आदिवासी बांधवावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे ते तात्काळ थांबवावे व गावातील या घटनेची सखोल
चौकशी करुन आदिवासी समाजाला न्याय दयावा अन्यथा धुळे जिल्हयात जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक दादा अहिरे, बापुजी फुले, राजेश मालचे, सुनिल सोनवणे, सुनिल भिल, महेंद्र मालचे, शामा मालचे राजेश पिरण भिल आदी पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply