शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडिद येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा.! |
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडिद येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा.!
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडिद ता. शिरपूर जि. धुळे येथे मा. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आदरणीय श्रीम.तृप्ती धोडमिसे मॅडमजी यांच्या मार्गदर्शनाने आज दि. १५ जून २०२२ रोजी शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून उल्हासात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमात गावातून रॅली, नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत, पुस्तक वितरण, तसेच प्रकल्प स्तरीय समिती सदस्य श्री.अत्तरसिंग पावरा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते डिजिटल क्लासरुमचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा व श्रीम.शमाताई पावरा यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कोडीदचे पोलीस पाटील श्री.भरत पावरा, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी श्री.कांतीलाल पावरा, माजी जि.प.सदस्य श्री.प्रकाश पावरा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रताप पावरा, प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी श्री एन.बी. पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.व्ही.डी.पाटील, सूत्रसंचालन श्री.डि.आर.पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद तसेच वर्ग चार कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
ह्यावेळी सर्वच मान्यवर व विद्यार्थी पालक ह्यांचे आभार व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.पाटील सर ह्यांनी केले.
Leave a Reply