Submission regarding abuse, ग्रामपंचायत गैरवापर बाबत निवेदन सादर.

महिला उपसरपंचच्या घरातच तीन घरकुल!

गैरवापर बाबत निवेदन सादर, थाळनेर चा प्रकार.

ग्रामपंचायत कारभार
ग्रामपंचायत चा गैरवापर 

तालुक्यातील थाळनेर येथील उपसरपंचांनी पदाचा गैरवापर करून कुटुंबातील 3 जणांना पंतप्रधान आवास योजना वर शबरी आवास योजना लाभ मिळवून शासनाची फसवणूक करून घरकुल मंजूर करून घेतले.

👇🏻👇🏻 हेही वाचा 👇🏻👇🏻

ड घरकुल यादी कशी पाहायची मोबाईल मध्ये लिंक.

 तसेच पूरग्रस्त कॉलनीत खुल्या भूखंड जागा प्रशान्त कोळी यांच्या नावाने बेकायदेशीर रित्या करून घेतल्या त्याची देखील चौकशी करून कायदेशीर कारवाही करण्याची मागणी करणारे निवेदन पंचायत समिती सदस्य विजय संतोष बागुल यांनी प्रभारी गट विकास अधिकारी सचिन शिंदे यांचा कडे केले आहे.

पदाचा गैरवापर केला.

थाळनेर येथील उपसरपंच आशाबाई वामन कोळी हे पदाचा कार्यरत असून त्यांनी पदाचा गैरवापर करून खुले भूखंड, घरकुल कुटुंबातील सदस्य चा नावे, इतर व्यक्तीच्या नावे तडजोड करून मंजूर करून घेतले. त्यसंदर्भात ल्या तक्रारी पंचायत समिती सदस्य विजय बागुल यांच्याकडे करण्यात आल्या होत्या.

गैरवापर करून शासनाची फसवणूक.

उपसरपंच आशाबाई कोळी यांनी पदाचा गैरवापर करून प्रशांत वामन कोळी वामन रामचंद्र कोळी यशोमती वामन कोळी (यशोमती संदीप सोनवणे )या कुटूंबातील सदस्य यांच्या नावे घरकुल मंजूर करून घेतले. सदरच्या मंजुरीसाठी त्यांनी संगनमताने घर, शेती, नोकरी, व्यवसाय व परीत्यक्ता प्रमाणपत्र याबाबत खोटी माहिती सादर करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !