Criminal News : क्रिकेट खेळताना वाद, डोक्यात हाणली सळई

Criminal News : क्रिकेट खेळताना वाद, डोक्यात हाणली सळई
Criminal News

 

Criminal News : क्रिकेट खेळताना वाद होऊन वेदांत नरेश बागडे (१८, रा. सोनी नगर) या तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई मारून दुखापत केली. या वेळी या तरुणाच्या चुलत भावालादेखील मारहाण करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी सोनी नगरात घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनी नगरातील मैदानावर काही तरुण क्रिकेट खेळण्यावरून वाद उद्भवला व दोन जणांनी वेदांत बागडे याला मारहाण करत त्याच्या डोक्यात लोखंडी सळई मारली. त्यावेळी या तरुणाच्या चुलत भावालादेखील शिवीगाळ करत मारहाण केली. (  क्रिकेट खेळताना वाद, डोक्यात हाणली सळई )

या प्रकरणी वेदांतने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंदूलाल पाटील करत आहेत.

हेही वाचा : 👇👇

  • लोक चिडले ग्रामस्थांचा संताप स्वाभाविक आहे. लिंक 
  • मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी हजारो रुपये चोरले लिंक
  • पोलिसांना द्यावे लागेल संरक्षण शासन निर्णय वाचाः लिंक 
  • पोलीस कस्टडीत मृत्यू झाला लिंक 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !