Adivasi Festival Holi 2024 : नमस्कार बांधवांनो तुमच्या साठी एक छान स लेख घेऊन आलो आहे, तो म्हणजे आदिवासींची होळी शेकडो वर्षांपासून आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये होळीचा सणाला परंपरा चालत आली आहे. दहा ते पंधरा दिवस चालणार्या भोंगर्या बाजारात आदिवासी बांधवांचे जीवन संस्कृती आपल्याला अनुभवास येते असते. सातपुड्याच्या पर्वतरांगेत आदिवासी पावरा, आदिवासी पाडवी, आदिवासी गावीत, आदिवासी भिल्ल अशा प्रमुख आदिवासी जमाती आढळतात. या जमातीत होळी या सणांना असाधारण असे महत्त्व आहे.
आदिवासीं होळी / Adivasi Festival Holi
आदिवासींची होळी महत्त्वाचा सण असून या सणाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडत असते. शिरपूर तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत ७० गावे व पाड्यांमध्ये आदिवासी समाजबांधव वास्तव्यास असून या ठिकाणी होळीच्या पार्श्वभूमीवर येत्या १८ मार्चपासून ठिकठिकाणी भोगन्य बाजार भरणार आहे.
भोंगऱ्या बाजार म्हणजे काय ? / Adivasi Festival Holi
होळी सण सुरू होण्यापूर्वी ८ ते १५ दिवस आधी जो आठवडे बाजार भरतो त्यास भोंगऱ्या अथवा गुलाल्या बाजार म्हणतात. या बाजारात होळी सणासाठी लागणाऱ्या सामानाची व साहित्याची आदिवासीबांधव खरेदी करतात. गुलाल उधळून या बाजाराचे स्वागत कैले जाते. या बाजारात जाण्यासाठी आदिवासी समाजबांधव पारंपरिक वेशभूषा करतात.
आदिवासी बांधवांची होळी ची संपूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा.
आदिवासीं बांधवांनचा पेहराव कसा आणि काय काय परिधान करतात? / Adivasi Festival Holi
त्यात प्रामुख्याने महिलांच्या हातात बाहट्चा, कडा तर पायात पिंजन्या, वाकल्या, कानात टुकऱ्या, गळ्ळ्यात टागली, कंबरेत आकर्षक करदोडा असतो हे सर्व दागिने चांदीचे असतात. पुरुष डोक्यावर पगडी किंवा टोपी, नेहरू शर्ट व धोतर परिधान करतात. अर्थात आदिवासी भागात जशी भाषा तसा पैहराव बदलत जातो. हा पेहराव करून बैलगाडीने भोंगऱ्या बाजाराला वाजत-गाजत मिरवणुकीने येतात.
भोंगऱ्या बाजार आणि होळी उत्सवाला तयारी / Adivasi Festival Holi
१४ रोजी शिरपूर तालुक्यातील खेडो पाड्यातील अनेक गावात येथील चौकात परिसरातील आदिवासी लोकांनी एकत्र होऊन भोंगऱ्या बाजार ची आणि होळी उत्सवाला तयारीला लागलेले दिसत आहे. गाव- पाड्यांवर भोंगऱ्या उत्सवाची जय्यत तयारी केली जात आहे. आदिवासी समाजबांधव संध्याकाळच्या वेळी ढोलच्या तालावर ठेका धरताना दिसत आहे.
हेही वाचा :
Information Links
Adivasi Festival Holi Photo |
येथे क्लिक करा |
Adivasi Festival Holi / आदिवासी होळी नृत्य |
येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Instagram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
History Of Bhagoria Hat 2024 | भगौरिया पर्व की पूरी जानकारी पढें.
[…] […]