अखिल भारतीय मातंग संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समारंभ वेगळा प्रकारे केला.
दि. 25/06/2023 रविवार रोजी अखिल भारतीय मातंग संघातर्फे मातंग समाजातील 10 वी आणि 12 वी च्या परिक्षेत 22 वीस उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुतन विद्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी मा. प्रविण काळे सर होते.प्रमुख पाहुणे म्हणून मा.सहशिक्षिका सुरेखा आगळे ,मा.प्रा.डाॅ जितेंद्र जगताप सर,अखील भारतीय ग्राहक पंचायत सेलु ता.अध्यक्ष सतीश जाधव ,सहशिक्षक गोटमुकले सर व्यासपीठावर उपस्थित होते.
असा वेगळ्या प्रकारे सत्कार केला.
या कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,एक झाडाचे रोप,पेन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मा.प्रविण काळे सर,सुरेखा आगळे मॅडम,प्रा जितेंद्र जगताप सर,संजय वायसे साहेब,काॅ अशोक उफाडे यांनी विद्यार्थाना मोलांचे मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम गोपेकर सर,आसारामजी घाटुळ , मारोतराव बाविसे, सटवाजी साठे,रामेश्वर खनपटे,अरुण थोरात, बाबासाहेब वाणी,अरुण हिवाळे,परमेश्वर गायकवाड, अश्विन केदासे सर,दिपक गायकवाड, महादेव गायकवाड, गोविंद साळवे,अशोक वैरागे,विजय कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
Leave a Reply