3 crore houses sanctioned under Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेच्या तीन कोटी घरांना मंजुरी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पंतप्रधान आवास योजने (पीएमएवाय) अंतर्गत तीन कोटी घरांच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली.

तत्पूर्वी नवीन सरकारचा पहिला निर्णय म्हणून मोदींनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी केली. आपले सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी सोमवारी पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले. यानंतर त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. पीएम शेतकरी सन्मान निधीच्या १७ व्या हप्त्यामुळे ९.३ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून याअंतर्गत जवळपास २० हजार कोटी रुपयांचे वाटप केले जाईल.

वीन सरकारच्या पहिल्याच निर्णयातून शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती असलेली प्रतिबद्धता दिसून येते. येत्या काळात सरकार शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करत राहणार असल्याचे मोदींनी म्हटले. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान आवास योजने (पीएमएवाय) अंतर्गत तीन कोटी घरांच्या उभारणीसाठी सहाय्यतेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय

मोदींची पहिली स्वाक्षरी शेतकरी सन्मान निधीच्या फाइलवर मंजुरी देण्यात आली. त्यानुसार पात्र कुटुंबांच्या घराची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने तीन कोटी अतिरिक्त ग्रामीण व शहरी कुटुंबांना घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाईल.

सरकारने २०१५-१६ पासून पीएमएवाय योजना लागू केली आहे. याअंतर्गत गत १० वर्षांत पात्र गरीब कुटुंबासाठी एकूण ४.२१ कोटी घरांची निर्मिती करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सर्व घरांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या अन्य योजनांसोबत समन्वय साधत शौचालय, गॅस, वीज आणि नळ जोडणीसारख्या पायाभूत सुविधा प्रदान केल्या जातात.

3 crore houses sanctioned under Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेच्या तीन कोटी घरांना मंजुरी

र शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन टप्प्यांत दोन-दोन हजार रुपयांच्या स्वरूपात एकूण ६ हजार रुपये टाकले जातात.

हेही वाचा :

How to RTI Gharkul Information In Marathi | घरकुल संबंधित माहिती चा अधिकार.

घरकुल बांधकामाकरिता 1.20 लाख ऐवजी 5 लाख अनुदान

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !